AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहित प्रियकराकडून तिला फक्त एकच गोष्ट हवी होती म्हणून गर्लफ्रेंडने आपलं सगळं..त्याच्या पत्नीसोबत अशी डील, सगळेच अवाक

आजच्या जमान्यात पैसा जास्त महत्वाचा आहे. पण असे सुद्धा आहेत, ज्यांच्यासाठी पैशापेक्षा प्रेम जास्त महत्वाचं आहे. प्रेमासाठी ते काहीही करायला तयार असतात. असचं एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आलय. महत्वाचं म्हणजे प्रेयसी सरकारी अधिकारी असून त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षाने मोठी आहे.

विवाहित प्रियकराकडून तिला फक्त एकच गोष्ट हवी होती म्हणून गर्लफ्रेंडने आपलं सगळं..त्याच्या पत्नीसोबत अशी डील, सगळेच अवाक
extramarital affair Image Credit source: AI Image
| Updated on: Feb 13, 2026 | 5:26 PM
Share

सध्याच्या जमान्यात प्रेम मोठं की पैसा? तर अनेक जण पैसा म्हणतील. पण आजही असे प्रेम करणारे आहेत, ज्यांच्यासाठी पैशापेक्षा प्रेम जास्त महत्वाचं आहे. प्रेमासाठी ते काहीही करायला तयार असतात. पैसा सुद्धा त्यांच्यासमोर कवडीमोल असतो. अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे प्रेयसीने विवाहित प्रियकराचं प्रेम मिळवण्यासाठी आपली सर्व संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. हा सर्व घटनाक्रम 90 च्या दशकातील ‘जुदाई’ चित्रपटाची आठवण करुन देतो. फरक इतकाच आहे की, ही स्टोरी पडद्यावरची नसून खऱ्या आयुष्यातली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळ फॅमिली कोर्टातील हे प्रकरण आहे.

भोपाळमध्ये एक 42 वर्षीय सरकारी कर्मचारी त्याच्याच विभागात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या प्रेमात पडला. ती वयाने 10 वर्षाने मोठी आहे. वेळेबरोबर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि प्रियकराच्या घरात तणाव वाढू लागला. पती-पत्नीमध्ये विवाहबाह्य संबंधांवरुन भांडणं वाढू लागली. याचा परिणाम त्यांच्या 16 आणि 12 वर्षाच्या मुलीच्या मनावर होऊ लागला. घरातलं वातावरण इतकं बिघडलं की, मोठ्या मुलीने फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठावले.

घटस्फोटासाठी तो तयार झाला

न्यायालयात काउंसलिंगची सत्र सुरु झाली. अनेक बैठकांनंतर पतीने स्पष्ट केलं की, त्याला त्याची ऑफिसमधील सहकारी आणि प्रेयसी सोबत रहायचं आहे. घटस्फोटासाठी तो तयार झाला. घरातला तणाव आता असहनीय झालाय हे सुद्धा त्याने मान्य केलं. त्याचं मुलींवर भरपूर प्रेम आहे. जवळपास पाच वर्ष चाललेल्या या वादात अखेर तडजोडीचा मार्ग निघाला.

पतीच्या प्रेयसीने लगेच हा प्रस्ताव स्वीकारला

पत्नीने तिच्या आणि मुलींच्या आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य दिलं. तिने पतीकडे डुप्लेक्स घर आणि 27 लाख रुपये रोख रक्कमेची मागणी केली. आश्चर्याची बाब म्हणजे पतीच्या प्रेयसीने लगेच हा प्रस्ताव स्वीकारला. घर आणि रोख रक्कम मिळून दीड कोटी रुपये द्यायला ती तयार झाली. प्रियकराच्या कुटुंबावर कुठलही संकट येऊ नये अशी तिची इच्छा होती. आता दोन्ही पक्ष परस्पर सहमतीने वेगळे झालेत. विवाहित प्रियकराकडून तिला प्रेम हवं होतं. म्हणून तिने तिचा पैसा अडका, संपत्ती त्याच्या पत्नीला देऊन टाकण्याचा निर्णय घेतला.

हे असं पहिलं प्रकरण असावं

1997 साली आलेला जुदाई चित्रपट सुद्धा असाच होता. पती, पत्नी आणि वो मध्ये पैशाच्या बदल्यात नात्याचा सौदा झाला होता. स्वार्थ हे त्यात मुख्य कारण होतं. भोपाळच्या या प्रकरणात परस्पर सहमती आणि मुलांच्या सुरक्षित भविष्याला आधार बनवण्यात आलं आहे. भोपाळमधील हे असं पहिलं प्रकरण असावं, जिथे प्रेयसीने प्रियकराला मिळवण्यासाठी इतकी मोठी रक्कम चुकवली असेल.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ