नाशिकमधील बहुप्रतीक्षित बैलगाडा अखेरच्या क्षणी रद्द, रद्द होण्यामागील कारण काय ?

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

Updated on: Dec 01, 2022 | 2:12 PM

नाशिकच्या ओझर येथे चंपाषष्ठीला खंडोबाची मोठी यात्रा असते, पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा असल्याने मोठी गर्दी ओझर येथे होत असते.

नाशिकमधील बहुप्रतीक्षित बैलगाडा अखेरच्या क्षणी रद्द, रद्द होण्यामागील कारण काय ?
Image Credit source: Google

नाशिक : नाशिक पासून जवळच असलेल्या ओझर येथे दरवर्षी चंपाषष्ठी मोठ्या जल्लोषात खंडोबाची यात्रा भरत असते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ओझर येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. मागील वर्षी तर बैलगाडा शर्यतीला परवानगी नसतांना बैलगाडा शर्यत झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यात यंदाच्या वर्षी कोरोणाचे कुठलेही कारण नसल्याने बैलगाडा शर्यत होणारच अशी स्थिती होती.मात्र, तरी देखील यंदाच्या वर्षी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले असतांना अखेरच्या क्षणी बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आली आहे. ओझर येथील ग्रामस्थानी याबाबत बैठक घेत यंदाच्या वर्षी बैलगाडा शर्यत होणार नाही असे एकमुखाने जाहीर केले आहे. लम्पि रोगाचा प्रादुर्भाव असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बैलगाडा शर्यत यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कानाकोपऱ्यातून आलेल्या बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.

नाशिकच्या ओझर येथे चंपाषष्ठीला खंडोबाची मोठी यात्रा असते, पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा असल्याने मोठी गर्दी ओझर येथे होत असते.

यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातून विविध नागरिक ओझर येथे असतात, याशिवाय या यात्रेचे आणखी एक आकर्षण म्हणजे बैलगाडा शर्यत असते.

मात्र, कोरोणा सलग दोन वर्षे ही बैलगाडा शर्यत होऊ शकली नव्हती, त्यात महत्वाची बाब म्हणजे मागील वर्षी बैलगाडा शर्यतीला मोठा गोंधळ झाला होता.

त्यामुळे यंदाच्या वर्षी बैलगाडा शर्यत होईलच अशी स्थिती असतांना आता बैलगाडा शर्यत लम्पि आजारामुळे रद्द करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

लम्पि आजाराचा नायनाट झाली की पुन्हा जोमाने बैलगाडा शर्यत करू असे गावकऱ्यांनी ठरवलं आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी अनेकांचा मोठा हिरमोड झाला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI