AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी, कुटुंबिय झोपलेले असताना चोरट्यांनी साधला डाव

Beed : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्यासह गावातील अनेकांच्या घरी घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी, कुटुंबिय झोपलेले असताना चोरट्यांनी साधला डाव
Dhananjay DeshmukhImage Credit source: Google
| Updated on: Apr 10, 2026 | 2:29 PM
Share

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बीडमधील अनेक सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हे हत्याकांड संपूर्ण देशात गाजले होते. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक ठिकाणी लोक रस्त्यावरही उतरले होते. अशातच आता पुन्हा एकदा मस्साजोग चर्चेत आले आहे. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्यासह गावातील अनेकांच्या घरी घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी

बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री घरात दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना हा प्रकार घडला आहे. सकाळी उठल्यानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून मस्साजोगमध्ये केज पोलिसांसह बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

कॉपर केबल चोरून नेले

समोर आलेल्या माहितीनुसार मस्साजोग गावात मध्यरात्री चोरट्यांनी धनंजय देशमुख यांच्या घरासह अनेक ठिकाणी घरफोडी केली तर तलावाच्या परिसरात असलेले कॉपर केबल चोरून नेले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे. केज पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम देखील मस्साजोग परिसरात दाखल झाली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

चोरीच्या या घटनेबाबत बोलताना धनंजय देशमुख यांनी सांगितले की, गावातील 7 ते 8 ठिकाणी घरफोडी झाली. आमच्या घरातून किमती साहित्य चोरीला गेलेले नाही. मात्र इतरांच्या घरातून सोनं, रोख रक्कम चोरीला गेली आहे तर अनेक शेतकऱ्यांचे कॉपर केबल चोरीला गेले आहे ज्याची किंमत 7 लाखांपर्यंत आहे अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. आता या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु करण्यात आला आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार