AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महादेव मुंडेंच्या मुलाला परळीत मारहाण, अभ्यासिकेमध्ये जात असतानाच..

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, दोन वर्षांपूर्वी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती, हे प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे, त्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या मुलाला देखील मारहाण करण्यात आली आहे.

मोठी बातमी! महादेव मुंडेंच्या मुलाला परळीत मारहाण, अभ्यासिकेमध्ये जात असतानाच..
crime newsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 21, 2026 | 10:04 PM
Share

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेमध्ये आहे. या प्रकरणाचा सध्या  एसआयटीकडून तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात नुकतीच काही आरोपींची नार्को टेस्ट देखील करण्यात आली आहे. हा तपास सुरू असतानाच धक्कादायक प्रकार घडला आहे. महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माहादेव मुंडे यांचा मुलगा हा अभ्यासिकेत जात असातना त्याला मारहाण करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली, या घटनेचा तपास सध्या एसआयटीकडून सुरू आहे. या प्रकरणात काही आरोपींची नार्को टेस्ट देखील करण्यात आली आहे. हा तपास सुरू असतानाच 19 फेब्रुवारी रोजी महादेव मुंडे यांचा मुलगा प्रणव मुंडे याला मारहाण करण्यात आली आहे. प्रणव हा सोमेश्वर नगर परिसरात असलेल्या अभ्यासिकेला जात होता, याचदरम्यान प्रणव याला एका व्यक्तीने मारहाण केली आहे, दरम्यान या प्रकरणात  दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षकांना निवेदन 

तर दुसरीकडे हा प्रकार घडल्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडून पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देण्यात आलं आहे, ज्यामध्ये आपल्याला वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्रीगणेश कराड तसेच त्यांच्या टोळीकडून धोका आहे, असं म्हटलं आहे.

19 फेब्रुवारी रोजी महादेव मुंडे यांचा मुलगा प्रणव मुंडे याला मारहाण झाली,  त्यानंतर 20  फेब्रुवारी रोजी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या मुलांसह कुटुंबाला   वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्रीगणेश कराड तसेच त्यांच्या टोळीकडून धोका असल्याचं निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं आहे. प्रणव मुंडे याला मारहाण झाल्यामुळे   महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेच्या हाती काही लागलय का? आणि यामुळेच या सर्व घडामोडी घडतायत का? असे अनेक  प्रश्न उपस्थित होत आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा