AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुजन विकास आघाडीचं विलिनीकरण ठरलं? हितेंद्र ठाकूर यांचा थेट नकार नाही; मोठ्या घडामोडींना वेग

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडी (बविआ) शिवसेनेत (शिंदे गट) विलीन होण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर यांनी विलिनीकरणाबाबत थेट नकार न दिल्याने चर्चांना बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची भेट अपेक्षित आहे, जिथे बविआचे भवितव्य आणि ठाकूर यांच्या मुलाचे राजकीय आगमन ठरू शकते.

बहुजन विकास आघाडीचं विलिनीकरण ठरलं? हितेंद्र ठाकूर यांचा थेट नकार नाही; मोठ्या घडामोडींना वेग
हितेंद्र ठाकूर - एकनाथ शिंदे
| Updated on: May 26, 2026 | 3:19 PM
Share

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना आमदारकी देऊन बदल्यात त्यांचा पक्षच शिवसेनेत विलिन करून घेतला होता. त्याचाच कित्ता आता या विधान परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला शिंदे गटाकडून विधान परिषद दिली जाणार आहे. त्याबदल्यात बहुजन विकास आघाडीचं विलिनीकरण करण्याचं ठरलं असल्याची जोरदार चर्चा आहे. हितेंद्र ठाकूर यांना जेव्हा विलिनीकरणाबाबतचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी थेट नकार दिला नाही. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचं शिवसेनेत विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर यांच्याशी मीडियाने संवाद सााधला. यावेळी त्यांना पक्ष विलिनीकरणावर विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी थेट भाष्य केलं नाही. विलिनीकरण होणार नाही, असं ठामपणे सांगितलं नाही. घोडा मैदान समोर आहे. आमची चर्चा सुरू आहे. मी आमदार होणार नाही. कोणताही बाप मुलाच्या पाठिशी उभा राहतो. निवडणुकीत पुढे काय होतंय ते पाहुया, अशी सूचक प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिली. याचाच अर्थ बविआचं शिवसेनेत विलिनीकरण होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

एकनाथ शिंदेंना भेटणार

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर हे आज उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत काय निर्णय होतो? की ही भेट थेट पक्षप्रवेशाची असणार आहे? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळपर्यंत या सर्व बाबतचं चित्र स्पष्ट होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

आम्ही निर्णायक…

माझ्यासोबत केवळ बविआची मते नाहीत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचीही मते आहेत. आम्ही निर्णायक ठरणार आहोत, असंही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. हितेंद्र ठाकूर यांनी विलिनीकरणाचा मुद्दा नाकारला नाही आणि शिंदे यांच्याशी चर्चाही सुरू असल्याचं म्हटलंय. तसेच बाप म्हणून मुलाच्या मागे उभं राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली. याचा अर्थ हितेंद्र ठाकूर मुलासाठी विधान परिषद घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. हितेंद्र ठाकूर आता फक्त विधान परिषद घेऊन पक्ष विलिन करणार की मंत्रीपदाचीही मागणी करणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?