बंद फाटक पार करण्याचा उत्साह नडला, लोकलपासून इंचभर अंतरावर कार-बाईक अडकल्या, नेरळमध्ये थरार

रेल्वे फाटक बंद होत असतानादेखील काही हौशी वाहनचालकांनी रेल्वेरुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला (Car and bike stuck in railway crossing).

बंद फाटक पार करण्याचा उत्साह नडला, लोकलपासून इंचभर अंतरावर कार-बाईक अडकल्या, नेरळमध्ये थरार

रायगड : मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ स्थानकाजवळ काल (1 जुलै) एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला (Car and bike stuck in railway crossing). रेल्वे फाटक बंद होत असतानादेखील काही हौशी वाहनचालकांनी रेल्वेरुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पलिकडचं फाटक बंद झाल्याने ते तिथेच अडकले. वाहनचालकांचा हलगर्जीपणा त्यांच्याच जीवावर बेतला. पण सुदैवाने ते बचावले (Car and bike stuck in railway crossing).

नेरळ रेल्वे स्थानकावरुन कर्जतच्या दिशेला जाणारी लोकल ट्रेन सुटली. ही रेल्वे फाटकाच्या काही अंतराजवळ आल्यानंतर स्वयंचलित पद्धतीने चालणाऱ्या फाटकाचे दोन्ही तावदाने बंद होण्यास सुरुवात झाली. मात्र, तरीदेखील तीन दुचाकी चालक आणि एका कारचालकाने रेल्वेरुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अडकले. दुचाकीस्वारांनी आपली वाहने फाटकाजवळ लावली. मात्र रेल्वे रुळ आणि फाटकाच्या कमी अतंरामध्ये कार अडकली.

हेही वाचा : Riteish Genelia Organ Donation | रितेश-जेनेलिया यांचा अवयवदानाचा निर्णय

कारमध्ये एकूण चार जण होते. भरधाव लोकलचा धक्का कारला लागून बाजूला उभ्या असलेल्या दुचाकींचेही नुकसान होणार होते. रेल्वे फाटकाबाहेर उभे असलेले वाहनचालक हा सर्व प्रकार बघत होते. त्यापैकी अनेकांना विपरीत घडेल, अशी भीती वाटू लागली.

कार चालकाने कशीबशी आपली कार सुरक्षित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अखेर त्यात तो यशस्वी झाला. भरधाव धावणारी लोकल आणि कार यांच्यात काही इंचाचे अंतर होते. दरम्यान, कार चालकाच्या जीवावर बेतले असताना अनुचित प्रकार न घडल्याने परिसरात श्वास रोखून पाहणाऱ्यांना हायसे वाटले.

हेही वाचा : गुजरातमध्ये चीनची सर्वाधिक गुंतवणूक, चिनी कंपनीच्या हाती भारताच्या डिजिटल चाव्या देणे घातक : सामना

रेल्वे फाटकवर असलेले कर्मचारी हे नेरळ-माथेरान मार्गावर काम करणारे कर्मचारी होते, अशी माहिती समोर येत आहे. नेरळ-माथेरान मार्ग बंद असल्याने त्यांना मुबंई-पुणे रेल्वे मार्गावर ड्यूटी लावली होती. दरम्यान, फाटक उघडताच पळ काढणाऱ्या कार चालकाचा आता रेल्वे प्रशासन शोध घेत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *