व्होकार्ट हॉस्पिटल अर्धनग्न आंदोलनप्रकरणी तब्बल 10 दिवसांनी जितेंद्र भावेंवर गुन्हा दाखल

परंतु आता हॉस्पिटल प्रशासनाने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीये. मात्र तब्बल आंदोलनाचा गुन्हा दाखल करण्यास 10 दिवस का लागले, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. Vokart Hospital Half-Naked Agitation

व्होकार्ट हॉस्पिटल अर्धनग्न आंदोलनप्रकरणी तब्बल 10 दिवसांनी जितेंद्र भावेंवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 8:12 PM

नाशिक: व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी अखेर आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तब्बल 10 दिवसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 25 तारखेला आंदोलन केल्यानंतर जितेंद्र भावेना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. परंतु आता हॉस्पिटल प्रशासनाने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीये. मात्र तब्बल आंदोलनाचा गुन्हा दाखल करण्यास 10 दिवस का लागले, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. (Case Has Been Registered Against Jitendra Bhave After 10 Days In The Vokart Hospital Half-Naked Agitation)

जितेंद्र भावे यांचं मत काय?

नाशिक पोलिसांनी जितेंद्र भावे यांना 25 मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. नाशिककरांच्या रेट्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. जितेंद्र भावे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना भारतीय वैद्यकीय व्यवस्थेतील चुकीच्या कामांविषयी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. “एकंदरीतच कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जो चाललेला खेळ आहे आणि तिथे रुग्णाचे कपडे काढले जातात रोजच्या रोज रुग्णाच्या नातेवाईकांची कपडे काढले जात होते. कॉर्पोरेट हॉस्पिटल आणि त्यांच्या पंखाखाली असलेले त्यांच्या पॅथॉलॉजिकल लॅब, त्यांच्या पंखाखाली असलेली डायग्नोस्टिक लॅब, चालू असलेले इतर वैद्यकीय व्यवसाय आणि कट प्रॅक्टिस या सगळ्यामुळे भारतीय माणूस पुरता नागवला गेला आहे. एक भारतीय माणूस आणि मी त्याचं प्रतीक म्हणून ते कपडे काढले होते. त्या माणसाला त्याचा हक्काचा डिपॉझिट परत मिळत नव्हतं आणि ते डिपॉझिट घेतल्याशिवाय त्या मुलाच्या आईवडिलांनीही अ‌ॅडमिशन दिलं नव्हतं.”,असं जितेंद्र भावे म्हणाले होते.

जितेंद्र भावे यांचं कपडे काढून अर्धनग्न आंदोलन

जितेंद्र भावे यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन केलं होतं. भावे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. इन्शुरन्स कंपनीकडून बिल मिळून ही हॉस्पिटलने अॅडव्हान्स 1 लाख 50 हजार रुपये परत देण्यास नकार दिल्याचा आरोप होता. मात्र हे अवाजवी बिल लावलं आहे, असा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप होता. त्यामुळे अॅडव्हान्स दीड लाख रुपये तरी परत द्यावी, अशी मागणी जितेंद्र भावे यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

VIDEO: नाशिकच्या खासगी रुग्णालयाकडून आकारलं जातंय अवाजवी बिल, सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप

कोरोना रुग्णांच्या मदतीला जैन समाजबांधव धावले, नाशिकच्या पिंपळगावात महिनाभरापासून अन्नदानाचा उपक्रम

Case Has Been Registered Against Jitendra Bhave After 10 Days In The Vokart Hospital Half-Naked Agitation

Non Stop LIVE Update
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.