महिलेच्या घरात घुसून मारहाण, विनयभंग; वाल्मिक कराडच्या मुलावर गुन्हा दाखल, अडचणी वाढल्या

वाल्मिक कराडच्या मुलावर घरात घुसून महिलेचा विनयभंग अन् मारहाण केल्याच्या प्रकरणात सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महिलेच्या घरात घुसून मारहाण, विनयभंग; वाल्मिक कराडच्या मुलावर गुन्हा दाखल, अडचणी वाढल्या
सुशील कराडवर गुन्हा दाखल
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 6:50 PM

मोठी बातमी समोर येत आहे, बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामधील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे. तर आता दुसरीकडे त्याचा मुलाग सुशील कराड याच्यावर देखील गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, तसेच पोक्सोचे कलम आणि महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 14 कलामांन्वये वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सुशील कराडच्या अडचणी वाढल्या आहेत.

या प्रकरणात   संशयित आरोपी सुशील कराड सोबतच  अनिल मुंडे आणि गोपी गंजेवर या अन्य दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सुशील कराड आणि त्याच्या साथीदाराने पिडीत महिला आणि तिच्या पतीसह मुलीला घरात घुसून धमकी देत मारहाण केल्याचा आरोप आहे, या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

नेमकं काय आहे प्रकरण?

सुशील कराड आणि त्याच्या साथीदाराने पिडीत महिला आणि तिच्या पतीसह मुलीला घरात घुसून धमकी देत मारहाण केल्याचा आरोप आहे.  तसेच त्यांच्या नावावरील प्लॉट, सोने धमकी देऊन स्वतःच्या ताब्यात घेतले. याशिवाय पीडित कुटुंबाच्या मालकिची वाहने देखील स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.  हा सर्व प्रकार 2024 साली घडला असून, पीडितेने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने सोलापूर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. दरम्यान सध्या वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात तुरुंगात आहे. तर दुसरीकडे आता त्याच्या मुलावर देखील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us