AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाशांचा खिसा कापला, वडापाव, समोसा आणि कोल्ड्रिंकच्या दरात मोठी वाढ, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

मुंबईकरांच्या आवडीचा वडापाव आता महागणार आहे! मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील वडापाव, समोसा आणि इतर खाद्यपदार्थांच्या दरात मोठी वाढ होणार असून, १ जूनपासून नवे दर लागू होतील. वडापाव १३ वरून २० रुपयांना, तर समोसा १२ वरून २० रुपयांना मिळेल. या दरवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशावर आर्थिक भार पडणार आहे.

प्रवाशांचा खिसा कापला, वडापाव, समोसा आणि कोल्ड्रिंकच्या दरात मोठी वाढ, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
वडापाव महागणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
| Updated on: May 27, 2026 | 8:09 AM
Share

मुंबई.. अनेकांच्या स्वप्नांची नगरी, स्वप्नांचं शहर.. या शहरात रोज अनेक जण येतात, आपलं पोट भरण्यासाठी, कोणी कामासाठी तर कोणी फिरण्यासाठी. मुंबईतील अनेक ठिकाणं जशी प्रसिद्ध आहेत, तसाच प्रसिद्ध आहे इथला खास वडापाव… खमंग, कुरकुरीत वाड, मऊसूत पाव, लाल चटणी आणि मिरची.. वाचूनच तोंडाला पाणी सुटलंन ना ! पण हाच वडापाव आता मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळवणार आहे, कारण वडापावची किंमत आता वाढणार असून त्याचता फटाक सर्वसमान्यांना बसणार आहे.

मुंबीकरांची लाईफलाइन असलेल्या रेल्वेचे तीन मार्ग, मध्य, पश्चिम आणि हार्बर. आता यापैकी मध्य रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे प्रवाशांचा खिसा कापला जाऊ शकतो. मध्य रेल्वेच्या अनेक स्टेशन्सवर बरेच स्टॉल्स असून तेथे विविद पदार्थ खायला मिळतात. त्याच पदार्थांची किंमत आता वाढणाप आहे. मध्य रेल्वेने वडापावची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला असून तो दर आता 13 रुपयांवरून 20 रुपयांवर जाणार आहे, तर समोसाही आता महागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक, प्रववाशांच्या खिशावर मोठा भार पडू शकतो.

वडापाव, समोसा महागणार, कधीपासून वाढणार दर ?

मध्य रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ आणि पेये नव्या महिन्यापासून महागणार आहेत. मध्य रेल्वेने वडा पावची किंमत 13 रुपयांवरून 20 रुपये केली असून आता समोसेही महाग होणार आहेत. येत्या 1 जूनपासून नवीन दर लागू होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्टॉल्सवरील मेन्यूमध्येही काही बदल करण्यात आले आहेत.

असे होणार बदल 

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वसामान्यांचा आवडता खाद्यपदार्थ असलेल्या वडापावची किंमत वाढणार आहे, रेल्वे स्टॉल्सवर मिळमआऱ्या वडापावची किंमत आता 13 वरून 20 रुपये, समोशाचा दर 12 वरून 20 रुपये होईल, तर रगडा पाव आता 20 नव्हे तर 25 रुपयांना मिळणार आहे.

तसेच रेल्वे अधिकारी हे पदार्थांच्या प्रमाणाचाही आढावा घेत असून प्रवाशांसाठी स्लश ड्रिंक्स, क्रीम डोनट्स, सूप, डोसा आणि नूडल्स यांचाही मेन्यूमध्ये समावेश करण्यात येणार आहे. देशभरात वाढणारी माहगाई, एलपीजीचे, इंधनाचे वाढलेले दर, वाढत्या किंमती या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर विकले जाणारे खाद्यपदार्थ आणि पेयं ही 1 जूनपासून महाग होणार आहेत.

सध्या 13 रुपये असलेल्या वडा पावची किंमत 20 रुपये होणार आहे, थेट 7 रुपये किंमत वाढेल. तर  तर समोशाच्या दरातही 12 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत मोठी वाढ होणार आहे ते दर 8 रुपयांनी वधारतील.  रेल्वे प्रशासन काही खाद्यपदार्थांच्या प्रमाणातही बदल करण्याची योजना आखत आहे. मात्र असं असलं तरीही ज्यूस आणि सोडा उत्पादनांच्या दरात कोणतीही दरवाढ होणार नाही.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल