AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्राकडून मदतीच्या दुसऱ्या हप्त्याची घोषणा, इतके कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर

राज्यातील ओल्या दुष्काळाने ग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने नुकतीच दोन हजार कोटींची तातडी मदत केली होती. त्यानंतर राज्य सरकारने 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. आता या मदतीचा दुसरा हप्ता केंद्राने महाराष्ट्रासाठी मंजूर केला आहे.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्राकडून मदतीच्या दुसऱ्या हप्त्याची घोषणा, इतके कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर
| Updated on: Oct 19, 2025 | 11:17 PM
Share

मान्सून काळात परतीच्या पावसादरम्यान मराठवाडा आणि सोलापूर भागात शेतकऱ्यांचे शेतीचे पुराने मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य सरकारने 2,215 कोटीची मदत जाहीर केली होती. आता केंद्र सरकारने राज्य सरकारला शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी 1566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारला एसडीआरएफच्या केंद्रीय हिश्शांचा दुसरा हप्ता म्हणून 1,950.80 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यंदा मान्सून आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून या राज्यांना आर्थिक मदत म्हणून 1,950.80 रुपये मंजूर केले असून त्यातील कर्नाटकसाठी 384.40 कोटी रुपये आणि महाराष्ट्रासाठी 1,566.40 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 2025-26 या वर्षासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारांना एसडीआरएफच्या केंद्रीय हिश्श्याचा दुसरा हप्ता म्हणून 1,950.80 कोटी रुपये आगाऊ मंजूर करण्यास मान्यता दिली आहे. या वर्षी नैऋत्य मान्सूनमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदत करण्यासाठी या राज्यांना मदत करण्यासाठी 1,950.80 कोटी रुपयांच्या एकूण रकमेपैकी 384.40 कोटी रुपये कर्नाटकसाठी आणि 1,566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत.

येथे पोस्ट पाहा –

मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्या ते म्हणतात की मान्सूनच्या काळात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल मदत म्हणून केंद्र सरकारने एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी 1566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह यांचा मी नितांत आभारी आहे. ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातील प्रक्रिया अजून सुरू सुरू आहे.

यावर्षी, केंद्र सरकारने एसडीआरएफच्या अंतर्गत 27 राज्यांना 13,603.20 कोटी रुपये आणि एनडीआरएफ अंतर्गत 15 राज्यांना 2,189.28 कोटी रुपये यापूर्वीच मंजर केले आहेत. याशिवाय, राज्य आपत्ती निवारण निधी (SDMF) मधून 21 राज्यांना 4,571.30 कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDMF) मधून 9 राज्यांना 372.09 कोटी रुपये मंजूर करण्यत आले आहेत.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र