AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चंद्रकांतदादा आता संधी गेली, कोल्हापुरातून लढण्याचा निर्णय तेव्हाच घ्यायला पाहिजे होता’

चंद्रकांत पाटील आता कोल्हापुरातील मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची भाषा करत आहेत. | Satej Patil

'चंद्रकांतदादा आता संधी गेली, कोल्हापुरातून लढण्याचा निर्णय तेव्हाच घ्यायला पाहिजे होता'
सतेज पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 03, 2020 | 7:15 PM
Share

कोल्हापूर: चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय 2019 सालीच घ्यायला पाहिजे होता. आता ती संधी निघून गेली आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील आता कोल्हापुरातील मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची भाषा करत आहेत. मात्र, आता यावरील चर्चेला अर्थ उरलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. मग तुम्ही कोणाला राजीनामा द्यायला लावणार, असा सवाल सतेज पाटील यांनी विचारला. (Satej Patil take a dig at Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोथरुड येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र सोडले होते. मी कोल्हापूर सोडून कोथरुडमधून निवडणूक लढलो, याचा विरोधकांकडून कायम उल्लेख केला जातो. माझी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची तयारी आहे. हवं तर कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा, मी पोटनिवडणुकीला उभा राहीन. या निवडणुकीत हरल्यास मी हिमालयात निघून जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी ठणकावून सांगितले होते.

चंद्रकांत पाटील यांच्या या आव्हानाला सतेज पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. आता या चर्चेला अर्थ नाही. कोल्हापुरातून लढण्याचा निर्णय तुम्ही 2019 मध्येच घ्यायला पाहिजे होता. आता ती संधी निघून गेली आहे, असे सतेज पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता यावर चंद्रकांत पाटील काय बोलणार, हे पाहावे लागेल.

‘साधाभोळा स्वभाव आणि विरोधकांचा काटा काढायचा, चंद्रकांतदादांचे दोन स्वभाव’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे लोकांना भरपूर मदत करतात. त्यांचे दोन स्वभाव आहेत. एक साधाभोळा आणि दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढायचा, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. चंद्रकांतदादांनी मला खूप त्रास दिला. सत्तेत असताना त्यांनी माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या. ईडीच्या धाडी टाकल्या. कोल्हापूर जिल्हा बँकप्रकरणीही त्रास दिल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

संबंंधित बातम्या:

मेधा कुलकर्णींना पदवीधर मतदारसंघाचे तिकीट तरी देणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात…

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर राजकारण सोडून हिमालयात जाईन -चंद्रकांत पाटील

चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही; मुश्रीफ यांची टोलेबाजी सुरूच

(Satej Patil take a dig at Chandrakant Patil)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...