AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही; मुश्रीफ यांची टोलेबाजी सुरूच

मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं सांगणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे.

चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही; मुश्रीफ यांची टोलेबाजी सुरूच
| Updated on: Nov 03, 2020 | 12:44 PM
Share

कोल्हापूर: मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं सांगणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil ) यांच्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी टीका केली आहे. चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही. उलटं मी काल जे बोललो त्याला त्यांनी पृष्टीच दिली आहे, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. (Hasan Mushrif reaction on chandrakant patil statement)

हसन मुश्रीफ यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. चंद्रकांतदादांना हिमालयात जाण्याची आश्यकता नाही. त्यांना हिमालयात जावे लागणार नाही. जी गोष्ट होणार नाही, ती करा असं म्हणणं बरोबर नाही. उलट माझ्या कालच्या वक्तव्यावर त्यांनी पृष्टी केली आहे. राज्यपालांबाबतच्या माझ्या वक्तव्याचं त्यांनी खंडन केलं नाही, असं सांगतानाच कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल चंद्रकांतदादांवर टीका केली नव्हती. त्यांची इथं आम्हाला गरज आहे, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

मुश्रीफ काय म्हणाले होते?

राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. “माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं”, असं मुश्रीफ म्हणाले होते.

पाटील यांनी फेटाळला होता आरोप

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांचा हा दावा फेटाळून लावला होता. हसन मुश्रीफ यांचे आरोप हास्यास्पद आहेत. हा राज्यपालांचा अवमान करण्याचा प्रकार असून लोकशाहीला घातक आहे. विनय कोरे यांच्या आईचं निधन झालंय. मी त्याठिकाणी त्यांच्या कुटुंबाच्या सांत्त्वनासाठी गेलो होतो. अशाठिकाणी मी कसं असं बोलेन?” असं पाटील म्हणाले होते.

तसेच, चंद्रकांतदादा यांनी कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असं ते म्हणाले होते. (Hasan Mushrif reaction on chandrakant patil statement)

संबंधित बातम्या:

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन; चंद्रकांतदादा कडाडले

राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार; हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

Follow Us
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार