AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नवऱ्याचं आकस्मिक निधन

अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचे पती, प्रसिद्ध निर्माते जयंत मुखर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती करणारे जयंत मुखर्जी संगीतकार हेमंत कुमार यांचे चिरंजीव होते. मुलीच्या निधनानंतर आता पतीची साथ सुटल्याने मौसमी चटर्जी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नवऱ्याचं आकस्मिक निधन
Moushumi ChatterjeeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2026 | 2:00 PM
Share

बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मौसमी चटर्जी यांचे पती आणि सिनेनिर्माते जयंत मुखर्जी यांचं निधन झालं आहे. गुरुवारी 12 नोव्हेंबर 2026 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. वार्धक्य आणि आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी मुखर्जी यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.

जयंत मुखर्जी यांनी राहत्या घरीच अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समोर आलं नाही. त्यांच्या कुटुंबाकडूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच मुखर्जी यांच्यावरील अंत्यसंस्काराची माहितीही देण्यात आलेली नाही.

अनेक सिनेमांची निर्मिती

जयंत मुखर्जी हे बॉलिवूडमधील एक मोठं नाव होतं. त्यांनी ‘मजाक’, ‘दो लडके दोनों कडके’ आणि ‘बीवी और मकान’ सारख्या सिनेमांची निर्मिती केली होती. ‘मजाक’ आणि ‘दो लडके दोनों कडके’ या दोन्ही सिनेमात मौसमी चटर्जी या मुख्य भूमिकेत होत्या. याशिवाय त्यांनी 1992मध्ये ‘तलाश’ या टीव्ही सीरिअलची निर्मितीही केली होती.

संगीताशी अतूट नातं

जयंत मुखर्जी यांचं संगीताशी अतूट नातं होतं. ते प्रसिद्ध संगीतकार हेमंत कुमार यांचे चिरंजीव होते. त्यांनी वडिलांचा संगीताचा वारसा जपला होता. बीवी और मकान या सिनेमात त्यांनी म्यूझिक डिपार्टमेंटमध्येही काम केलं होतं. केवळ सिने निर्मितीतच ते गुंतले नाहीत, तर संगीताच्या क्षेत्रातही त्यांचा वावर होता.

वयाच्या 15 व्या वर्षी लग्न

मौसमी चटर्जी आणि जयंत यांच्या लग्नाचा किस्सा अजब आहे. दोघांनी 1972मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळी मौसमीचं वय केवळ 15 वर्ष होतं. त्यावेळी त्या इयत्ता दहावीत शिकत होत्या. आपल्या मावशीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अत्यंत कमी वयात लग्न केलं होतं. म्हणजे लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपुष्टात येतं असं सांगितलं जातं. त्यामुळे अनेक अभिनेत्री त्यावेळी उशिराने लग्न करत होत्या. पण मौसमी यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी लग्न करून सर्वांना चकित करून सोडलं होतं. एवढेच नव्हे तर लग्नानंतरही करिअर होतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं होतं. 70-80च्या दशकात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना व्हायची.

मुलीचंही निधन

जयंत आणि मौसमी यांना दोन मुली आहेत. पायल आणि मेघा मुखर्जी. यापूर्वी त्यांची मुलगी पायल हिचं 13 डिसेंबर 2019मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी निधन झालं होतं. त्या बराच काळ कोमात होत्या. आधीच मुलगी गेल्यानंतर आता पतीनेही साथ सोडल्याने मौसमी यांच्यावर दु:खाचा पहाडच कोसळला आहे.

Follow Us
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही
NCP Merger : पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान पुण्यात राजकीय खलबतं
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका