AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन; चंद्रकांतदादा कडाडले

मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं आहे.

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन; चंद्रकांतदादा कडाडले
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 02, 2020 | 10:06 PM
Share

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढली. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं आहे. ते पुण्यात वर्षपूर्ती कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते (Chandrakant Patil on Election from Kolhapur and Hasan Mushrif).

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती.”

यावेळी त्यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या दाव्यावरही टीका केली. “हसन मुश्रीफ यांचे आरोप हास्यास्पद आहे. हा राज्यपालांचा अवमान करण्याचा प्रकार असून लोकशाहीला घातक आहे. विनय कोरे यांच्या आईचं निधन झालंय. मी त्याठिकाणी त्यांच्या कुटुंबाच्या सांत्त्वनासाठी गेलो होतो. अशाठिकाणी मी कसं असं बोलेन?” असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

हसन मुश्रीफांचा दावा म्हणजे गावगप्पा; राष्ट्रवादीच्या दाव्यावर भाजपचा पलटवार

दरम्यान, हसन मुश्रीफांचा राज्यपाल नियुक्त आमदारांवरील आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, “हसन मुश्रीफांचा हा दावा पू्र्णपणे खोटा आहे. त्यांच्या या गावगप्पा आहेत. ग्रामविकास मंत्रीपदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने असं बोलू नये. मात्र, जे काम आपल्याला झेपत नाही त्याबद्दल अपप्रचार करण्याची राष्ट्रवादीची पद्धतच आहे.”

तसेच, मुश्रीफांचा आरोप फेटाळून लावताना प्रस्तावित आमदारांची यादी मंजूर होऊ नये ही शरद पवारांचीच योजना असू शकते, असा पलटवारही त्यांनी राष्ट्रवादीवर केला. “शरद पवार यांचं राजकारण खुद्द पवार सोडून बाकी कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे आमदारांची ही यादी मंजूर होऊ नये, अशी योजना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही असू शकते.” असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा :

राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार; हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

संजय राऊत जगातील 182 देशांचे प्रमुख, चंद्रकांत पाटलांकडून शालजोड्या

अशोक चव्हाण किंवा दीपक केसरकरांची नाराजी काहीतरी पदरात पाडण्यासाठी, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

व्हिडीओ पाहा :

Chandrakant Patil on Election from Kolhapur and Hasan Mushrif

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...