AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : सुट्या मसाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्री बंद होणार? आता नवी मागणी चर्चेत, IAS तुकाराम मुंढे काय निर्णय घेणार?

IAS Tukaram Mundhe : सुट्या मसाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्री बंद करण्याची मागणी समोर आली आहे. ही मागणी आयुक्त तुकाराम मुंढे मान्य करणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Tukaram Mundhe : सुट्या मसाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्री बंद होणार? आता नवी मागणी चर्चेत, IAS तुकाराम मुंढे काय निर्णय घेणार?
tukaram mundhe newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 11:49 AM
Share

रणजित जाधव, प्रतिनिधी : अन्न व औषध प्रशासनाने सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. आता सुट्या मसाल्यांबाबत एफडीएने नवीन नियमावली जारी केली आहे. मसाल्यात रंग टाकल्यास कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. सुटया मसाल्यानंतर आता ऑनलाइन औषध विक्री बंद करण्याची मागणी पुढे आली आहे. आता केमिस्ट असोसिएशनची नवीन मागणी चर्चेत आली आहे. त्यांनी ऑनलाइन औषध विक्री बंद करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे म्हणत त्यांनी ही मागणी केली आहे. या मागणीनंतर आता अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

IAS तुकाराम मुंढे यांच्यावरच गंभी आरोप 

राज्यात ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनने केला आहे. या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाकडे तुकाराम मुंढे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप केलाय. अनेक धोकादायक औषध ही ऑनलाइन पद्धतीने विक्री केली जातात. जी औषधे केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच विक्री केली जावी, असा नियम आहे. त्यानंतरही ती औषधे खुलेआम विकली जात आहेत.

ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालणार का?

बनावट प्रिस्क्रिप्शन,औषधांचा गैरवापर आणि नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका लक्षात घेता अन्न व औषध आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकऱ्यांनी केली आहे. ऑनलाइन औषध विक्रीविरोधात काही महिन्यांपूर्वी औषध विक्रेत्यांनी देशव्यापी बंद पुकारला होता. ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होत असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी बंदची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुन्हा केमिस्ट असोसिएशनने ऑनलाइन औषध विक्रीची मागणी केली आहे. एका दिवसाआधीच मुंढे यांनी सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली. त्यानंतर आता ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालणार का, याकडे असोसिएशनचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर