AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal: काळजाचा ठोका वाढवणारी बातमी! पेट्रोल-डिझेलचा साठा फक्त… भुजबळांनी चिंता वाढवली

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इंधन साठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या देशाकडे पेट्रोल आणि डिझेलचा किती साठा शिल्लक राहिली आहे याची माहिती दिली आहे.

Chhagan Bhujbal: काळजाचा ठोका वाढवणारी बातमी! पेट्रोल-डिझेलचा साठा फक्त... भुजबळांनी चिंता वाढवली
Chagan BhujbalImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 20, 2026 | 1:07 PM
Share

सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, त्याचे सावट आता आपल्यावरही दिसू लागले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इंधन साठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या देशाकडे पेट्रोल आणि डिझेलचा किती साठा शिल्लक राहिली आहे याची माहिती दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले वाचा…

“आमच्याकडे सध्या केवळ १ महिना पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे,” असा खळबळजनक खुलासा भुजबळांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात इंधनाची मोठी टंचाई निर्माण होणार का, अशी भीती आता नागरिकांमध्ये पसरली आहे.

केरोसीनचा साठा मुबलक, पण साखळी तुटली!

पेट्रोल-डिझेलची चिंता असली तरी राज्याकडे केरोसीनचा (घासलेट) साठा मात्र भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, केरोसीन वाटपाची जी साखळी (सप्लाय चेन) होती, ती सध्या पूर्णपणे तुटली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि वाटप सुरळीत करण्यासाठी काही विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ही साखळी पूर्ववत करण्यासाठी आता केरोसीन वाटपाची विनामूल्य परवानगी दिली जाईल, असेही भुजबळांनी स्पष्ट केले आहे.

जागतिक युद्धाची झळ; पण भारताची स्थिती उत्तम

हा प्रश्न केवळ मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नसून तो एक जागतिक प्रश्न बनला आहे. इराण, अमेरिका आणि इतर देशांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वाद आणि राजकीय घडामोडींमुळे जगभरात होणारा इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा फटका युरोपपासून जपानपर्यंत आणि अगदी अमेरिकेसारख्या महासत्तेलाही बसला असून तिथेही पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. इंधनाची आवक सुरळीत सुरू राहण्यासाठी त्यांनी अनेक नवीन देशांशी संपर्क साधून चर्चा सुरू केली आहे. जागतिक संकट मोठे असल्याने आपल्यालाही थोडी अडचण सहन करावी लागू शकते, परंतु इतर देशांच्या तुलनेत आजतरी आपल्या भारताची परिस्थिती अतिशय चांगली आणि नियंत्रणात आहे, असा दिलासाही त्यांनी दिला.

३० जूनच्या आत अर्ज करा, अन्यथा एलपीजी सिलेंडर बंद!

इंधन साठ्यासोबतच छगन भुजबळ यांनी पीएनजी (PNG) गॅस पाइपलाइनबाबत नागरिकांना कडक इशारा दिला आहे. ज्या ज्या भागात गॅस पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे किंवा कंपन्या पाईपलाईन जोडणीचे काम करत आहेत, तिथल्या नागरिकांनी ३० जूनच्या आधी जोडणीसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.

Follow Us
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...