राज्यात दुष्काळ जाहीर, पंकजा मुंडे बांधावर, थेट म्हटले…
राज्य सरकारकडून राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यात स्थिती गंभीर आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर केला. परिस्थिती गंभीर आहे. अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आलीत.

राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. ट्रिगर 1 लागू झालेल्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दुष्काळ जाहीर केला. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ, याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी दुष्काळ दाैऱ्यावर होते. बांधावर पोहोचून सरकारकडून दुष्काळाची पाहणी करण्यात आली. दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. जमीन महसुलात सूट देण्यात आली. पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली. कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट देण्यात आली. आज नांदेड, परभणी येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून दुष्काळाची पाहणी केली जातंय.
मंत्री पंकजा मुंडे यांचा दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा केला. परळी तालुक्यातील लिंबूटा शिवारामध्ये जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मंत्री पंकजा मुंडे यांनी वाळलेल्या सोयाबीनची पाहणी केली. अशी परिस्थिती आहे, सोयाबीनला शेंगा नाहीत कापसाला बोंड नाहीत. शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे आम्ही सर्वजण बांधावर आहोत.
बत्तीस हजार कोटीची कर्जमाफी देवेंद्र फडवणीस यांनी केली. विज बिल माफी दिली. परत अशी परिस्थिती आल्यावर शेतकऱ्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. हे बळीराजाचं सरकार आहे त्यांचा बळी जाऊ दिला जाणार नाही. ज्यांची नोंद झालेली आहे त्यांना कर्जमाफी भेटलेली आहे. अकाउंटमध्ये कुठलीही तुरटी नसल्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत.
शेतकरी वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू मजुरासाठी आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभे राहील. सारा डेपो बाबत आम्ही मोठं प्लॅनिंग करत आहोत. गाळ पेऱ्याचं प्लॅनिंग करत आहोत. जिथे चारा कमी आहे तिथे चाराची प्लॅनिंग केली जात आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. 75 टक्के राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला.
