CIDCO Lottery 2022: सिडकोतर्फे 4158 घरांची बंपर लॉटरी; 251 कमर्शियल गाळे खरेदीची संधी

सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण 245 वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत. तसेच नेरूळ रेल्वे स्थानक संकुल आणि जुईनगर स्थानक संकुल येथील प्रत्येकी 3 याप्रमाणे एकूण 6 कार्यालये (कमर्शिअल प्रीमाईसेस) विक्रीकरिता उपलब्ध आहेत.

CIDCO Lottery 2022: सिडकोतर्फे 4158 घरांची बंपर लॉटरी; 251 कमर्शियल गाळे खरेदीची संधी
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 10:33 PM

नवी मुंबई : सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे आणि रेल्वे स्थानक संकुलांतील 6 कार्यालये (कमर्शियल प्रीमाईसेस) विक्रीच्या योजना सिडको महामंडळातर्फे(CIDCO Lottery 2022) सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी व व्यावसायिकांना या योजनांच्या माध्यमातून सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

महागृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4,158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या दरातील या 4,158 घरांपैकी 404 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित 3,754 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा रू. 6,00,000 तर अनुदानाची रक्कम रू. 2,50,000 निश्चित करण्यात आली आहे. नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी सदर घरे असलेली गृहसंकुले वसलेली आहेत.

या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इ. सर्व सामाजिक सुविधाही उपलब्ध आहेत.

या सोबतच सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण 245 वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत. तसेच नेरूळ रेल्वे स्थानक संकुल आणि जुईनगर स्थानक संकुल येथील प्रत्येकी 3 याप्रमाणे एकूण 6 कार्यालये (कमर्शिअल प्रीमाईसेस) विक्रीकरिता उपलब्ध आहेत.

या योजनांद्वारे समाजातील सर्व घटकांना सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे, ज्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात मदत होण्यासोबतच नवी मुंबईच्या वाणिज्यिक क्षमता वृद्धिंगत होऊन शहराच्या आर्थिक विकासासही हातभार लागणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी व व्यावसायिकांना विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. नागरीक, व्यापारी व व्यावसायिकांनी लवकरात लवकर या योजनांचा लाभ घ्यावा व आपले घराचे आणि व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.