माझी सीरियस तब्येत खराब झालीय, पास करा की… विद्यार्थ्यांने उत्तरपत्रिकेत असं काही लिहिलं की…

परीक्षा कोणतीही असो, त्यामध्ये कॉपी करणारे किंवा विचित्र उत्तरं लिहीणारे काही विद्यार्थी असतातचं. आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षांतील उत्तरपत्रिकांमध्ये अजब-गजब अपील लिहीण्यात आल्याचे समोर आले आहे, मात्र आता त्यामध्ये ग्रॅज्युएशनचे विद्यार्थीही मागे नसल्याचे दिसून आले.

माझी सीरियस तब्येत खराब झालीय, पास करा की... विद्यार्थ्यांने उत्तरपत्रिकेत असं काही लिहिलं की...
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 9:45 AM

परीक्षा कोणतीही असो, त्यामध्ये कॉपी करणारे किंवा विचित्र उत्तरं लिहीणारे काही विद्यार्थी असतातचं. आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षांतील उत्तरपत्रिकांमध्ये अजब-गजब उत्तरं लिहीण्यात आल्याचे समोर आले आहे, मात्र आता त्यामध्ये ग्रॅज्युएशनचे विद्यार्थीही  मागे नसल्याचे दिसून आले. हे नवे प्रकरण बिहारच्या आरा येथील वीर कुंवर सिंह विश्वविद्यालयातील असून तेथील उत्तर पत्रिकांमधील विद्यार्थ्यांची उत्तरं पाहून शिक्षकही चक्रावले. परीक्षाा पास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अजब-गजब मागणी करत पास करण्याची विनंती केल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

सध्या विद्यापीठाच्या ऑनर्स विषयांच्या प्रती मूल्यांकनासाठी पाठवल्या जात आहेत, तर जीईएसच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन विद्यापीठ स्तरावरच केले जात आहे. मात्र या उत्तरपत्रिकांमध्ये परीक्षकांना आश्चर्यकारक उत्तरे वाचायला मिळत आहेत. एवढंच नव्हे तर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तर पत्रिकांमध्ये विचित्र विनंती करून आपल्याला पास करा असे आवाहनही केले आहे.

केली अजब विनंती

उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करताना त्यामध्ये अनेक अजब गोष्टी लिहील्याचे दिसून आले. आईची तब्येत बिघडली, अभ्यास करू शकलो नाही, प्लीज पास करा असं कोणी लिहीलं तर एका विद्यार्थ्याने तर स्वतःची प्रकृती गंभीर असल्याचे लिहून मला पास करा अशी विनंतीही केली. बरं, अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासताना काही उत्तरपत्रिकांवर पैशांच्या नोटा ठेवल्याचे आढळून आले. तर काही विद्यार्थ्यांनी असे आवाहन केले जे वाचून शिक्षकांनाही विचार करण्यास भाग पाडले आहे.

माझी सीरियस तब्येत खराब झालीय, पास करा की…

GES च्या उत्तरपत्रिकेत, एका महिला उमेदवाराने प्रश्नांची उत्तरे लिहीली, पण सर्वात शेवटी तिने विनंती केली आहे. ‘माझी तब्येत खूपच खालावली होती. हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो की मला पास करा. सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, पण सगळी उत्तर लिहू शकले नाही. कृपया चांगले गुण देऊन (मला ) पास करा व्हा’ अशी विनंतीच तिने केली आहे. तर एका विद्यार्थ्याने नोकरी मिळावी म्हणून चांगले गुण देण्याची मागणी केल्याचे शिक्षकांनी नमूद केले.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.