आंबेगावमध्ये ऊसाच्या फडात दोन पिल्लांसह बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत

| Updated on: Nov 25, 2021 | 1:50 PM

एक मादी व नर असे दोन बछडे ताब्यात घेतले असून उसाच्या शेतातुन मोठी बिबट मादी पळून गेली आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्त करत आहे. दरम्यान दिवसा बिबट्यांची पिल्ल मिळाल्याने ते पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरु असल्याने ग्रामस्थां मध्ये घबराट पसरली आहे.

आंबेगावमध्ये ऊसाच्या फडात दोन पिल्लांसह बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत
Leopard
Follow us on

पुणे – जिल्ह्यातील ऊस शेतीसाठी प्रगत बागायती भाग म्हणून आंबेगाव, मंचर हा या परिसर ओळखला जातो. मात्र याच भागातील नागरिक मागील काही काळापासून भीतीच्या छत्रछायेखाली जगत आहे. ऊस शेतीमुळं या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. अशातच बेल्हवरे वस्तीत उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना एक बिबट मादी व तीची दोन पिल्ले ( बछडे ) अचानक आढळून आले आहेत.

पिंजरा लावण्याची मागणी
वनविभागाला कळताच तातडीने, वनपाल यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत घटनास्थळी दाखल झाले. एक मादी व नर असे दोन बछडे ताब्यात घेतले असून उसाच्या शेतातुन मोठी बिबट मादी पळून गेली आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्त करत आहे. दरम्यान दिवसा बिबट्यांची पिल्ल मिळाल्याने ते पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरु असल्याने ग्रामस्थां मध्ये घबराट पसरली आहे.

दुसरीकडे आंबेगावतील हिंगेमला परिसरत गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाला यश आले आहे. बिबट्याला जेरबंद केल्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यांपासून बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत फस्त केले होते. जेरबंद बिबट्याला जुन्नरमधील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यात आले.

Nagpur चार अल्पवयीन मुलांनी केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या, शहाणपणाच्या गोष्टी सांगणे भोवले

हा फोटो पाहून कुणी म्हणू शकतं, आई कुठं काय करते?, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट फोटो

Marathi Movie | प्रेमाची अनोखी केमिस्ट्री, यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाई म्हणणार ‘वन फोर थ्री’!