AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajpal Yadav Cheque Bounce Case मध्ये मोठा ट्विस्ट! अर्धे कर्ज तर फेडलंय कॉमेडियनने?

Rajpal Yadav Cheque Bounce Case : लोकप्रिय बॉलिवूड कॉमेडियन राजपाल यादव हा धनादेश अनादरप्रकरणात सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे. त्याच्याविषयीच्या अनेक अपडेट सध्या समोर येत आहे. त्यातच एक नवीन अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, कॉमेडियनने या प्रकरणातील अर्धी रक्कम जमा केली आहे.

Rajpal Yadav Cheque Bounce Case मध्ये मोठा ट्विस्ट! अर्धे कर्ज तर फेडलंय कॉमेडियनने?
राजपाल यादव चेक बाऊन्सप्रकरणImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 13, 2026 | 4:41 PM
Share

Rajpal Yadav Cheque Bounce Case : बॉलिवूडचा लोकप्रिय कॉमेडियन राजपाल यादव सध्या प्रकाश झोतात आला आहे. तो सध्या धनादेश अनादर प्रकरणात सध्या तिहार तुरूंगात आहे. त्याच्यासाठी बॉलिवूड धावून आले आहे. अनेक अभिनेत्यांनी त्याला मदत जाहीर केली आहे. तर त्याच्या आप्तेष्टांनी अजून एक रुपया सुद्धा खात्यात आला नसल्याचा दावा केला आहे. तर याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार राजपाल यादव याने कर्जाऊ रक्कम घेतली होती. त्यातील अर्धी रक्कम त्याने परतफेड केली आहे. तर अर्धी रक्कम, उर्वरीत रक्कम बाकी आहे. तर लवकरच ही रक्कम तो चुकवणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी होईल. त्यानंतर याप्रकरणात पुढे काय होईल हे समोर येईल.

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात अपडेट काय?

Rajpal Yadav दीर्घ काळापासून सुरू असलेल्या धनादेश अनादरप्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहे. गुरुवारी त्याच्या जामीन अर्जावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. अर्थात कोर्टाकडून त्यांना कोणता दिलासा मिळाला नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी होईल. याप्रकरणात प्रतिवादी मुरली प्रोजेक्ट कंपनीला पण नोटीस बजावण्यात आली आहे. राजपालाचा वकील भास्कर उपाध्याय याने या प्रकरणाशी संबंधित एक मोठी अपडेट शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विनोदी नटावर कर्जाचा डोंगर होता.

या कर्जातील अर्धी रक्कम त्याने चुकती केली आहे. तर उर्वरीत रक्कम तो लवकरच जमा करणार आहे. जे पाच कोटी रुपये गुंतवले होते. ते परत करण्यास राजपाल यादव याने कधी नकार दिला नाही. पुढील सुनावणीवेळी याविषयी निर्णय होऊ शकतो. 4 फेब्रुवारी रोजी या विनोदी अभिनेत्याने स्वतः तिहार तुरुंगात जाऊन शरणागती पत्करली होती. त्यावेळी त्यांनी भावनिक होत आपल्याकडे एक छदामही नसल्याचा दावा केला होता. तर त्याला मदत करणारा एकही मित्र नसल्याचे म्हटले होते. या सर्व प्रकरणात तो हतबल असल्याचे दिसले. त्यानंतर सोनू सूदपासून ते सलमान खानपर्यंत अनेक अभिनेते त्याला मदतीसाठी पुढे आले. आता तो लवकरच तुरुंगाच्या बाहेर येईल असं म्हटल्या जात आहे.

काय आहे हे प्रकरण?

राजपाल यादव याने 2010 मध्ये एक चित्रपट केला होता. हा चित्रपट तयार करण्यासाठी त्याने मुरली प्रोजेक्ट कंपनीकडून 5 कोटींचे कर्ज घेतले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर येताच आपटला. या चित्रपटामुळे राजपाल यादव याला मोठे नुकसान सहन करावे लागले. हे कर्ज तो फेडू शकला नाही. त्यामुळे त्याला अखेर तुरुंगात जावे लागले. त्याने दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली आहे. त्याची सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी होईल.

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....