AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shashi Kapoor : लग्नाआधी प्रसिद्ध अभिनेत्याला समलिंगी समजायची पत्नी; वडिलांचा विरोध झुगारून केलं लग्न, अशी होती फिल्मी लव्हस्टोरी

Bollywood Actor Love Story : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी लग्नाआधी त्याला समलिंगी समजायची. या लग्नाला वडिलांचाही विरोध होता. काय घडलेलं नेमकं? जाणून घ्या.

Shashi Kapoor : लग्नाआधी प्रसिद्ध अभिनेत्याला समलिंगी समजायची पत्नी; वडिलांचा विरोध झुगारून केलं लग्न, अशी होती फिल्मी लव्हस्टोरी
| Updated on: Nov 27, 2026 | 3:03 PM
Share

बॉलिवूडमध्ये अनेक लव्हस्टोरी गाजल्या. त्यापैकी शशी कपूर आणि त्यांची पत्नी जेनिफर केंडल यांची प्रेमकहाणीही अशीच होती. शशी कपूर यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वावर अनेक तरुणी फिदा होत्या. मात्र, त्यांचं मन जिंकलं ते एका परदेशी अभिनेत्रीनं. जेनिफर या शशी कपूर यांच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात एका नाटकाच्या निमित्तानं झाली आणि पुढे दोघांनी सर्व अडथळ्यांवर मात करत लग्न केलं.

शशी कपूर यांच्या स्वभावामुळे जेनिफर यांचा गैरसमज

शशी कपूर आणि जेनिफर केंडल यांची पहिली भेट कोलकाता येथे एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. जेनिफर या प्रसिद्ध थिएटर कलाकार होत्या. त्यांचे वडील जेफ्री केंडल हे ‘शेक्सपिअरियाना’ या नाट्यसंस्थेचे मालक होते. पहिल्याच भेटीत दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. मात्र, सुरुवातीला जेनिफर यांना शशी कपूर यांच्या स्वभावाबद्दल एक वेगळाच गैरसमज झाला होता. शशी कपूर अतिशय लाजाळू होते. पाश्चात्त्य संस्कृतीत लोक एकमेकांना भेटताना हात मिळवून किंवा मिठी मारून अभिवादन करतात. मात्र, शशी कपूर यांना अशा प्रकारे जवळीक दाखवताना संकोच वाटायचा. त्यांच्या या स्वभावामुळे जेनिफर यांना ते समलिंगी असावेत, असं वाटलं होतं. शशी कपूर यांनी त्यांच्या ‘पृथ्वीवालाह’ या पुस्तकातही या मजेशीर आठवणीचा उल्लेख केला आहे.

वडिलांचा विरोध झुगारून जेनिफर यांनी केलं लग्न

जेनिफर यांचे वडील जेफ्री केंडल यांना आपल्या मुलीने भारतीय व्यक्तीशी लग्न करणं मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी या नात्याला विरोध केला होता. इतकंच नाही, तर जेनिफर यांनी शशी कपूर यांच्याशी लग्न केल्यास ‘शेक्सपिअरियाना’ नाट्यसंस्था सोडावी लागेल, अशी अटही त्यांनी घातली होती. मात्र, शशी कपूर यांच्या प्रेमात पडलेल्या जेनिफर यांनी वडिलांच्या विरोधाची पर्वा केली नाही. त्यांनी नाट्यसंस्था सोडण्याचा निर्णय घेतला आणि शशी कपूर यांच्याशी लग्न केलं.

पृथ्वी थिएटरच्या उभारणीत जेनिफर यांचं मोठं योगदान

शशी कपूर आणि जेनिफर यांनी केवळ संसारच थाटला नाही, तर भारतीय रंगभूमीच्या विकासासाठीही महत्त्वाचं काम केलं. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यांना कुणाल कपूर, करण कपूर आणि संजना कपूर अशी तीन मुलं झाली.

‘पृथ्वी थिएटर’ हा कपूर कुटुंबाचा सांस्कृतिक वारसा होता. मात्र, एक काळ असा होता, जेव्हा हे थिएटर बंद पडण्याच्या मार्गावर होतं. अशा वेळी जेनिफर यांच्या आग्रहामुळे शशी कपूर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून थिएटरसाठी जमीन विकत घेतली आणि त्याची पुनर्बांधणी केली. पुढे मुंबईतील रंगभूमीचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून पृथ्वी थिएटर नावारूपाला आलं. जेनिफर यांनीही अनेक नाटकांच्या निर्मितीत सहभाग घेतला.

शशी कपूर यांच्या आयुष्यात जेनिफर यांचं स्थान केवळ पत्नीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांच्या स्वभावात शिस्त आणण्यापासून ते कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यापर्यंत जेनिफर यांचा मोठा वाटा होता. विशेष म्हणजे, दोघांचं लग्न झालं तेव्हा शशी कपूर यांच्याकडे काम नव्हतं. मात्र, लग्नानंतर त्यांना चित्रपटांच्या इतक्या ऑफर्स मिळू लागल्या की, ते सतत शूटिंगमध्ये व्यग्र असायचे. एका दिवसात अनेक शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळे लोक त्यांना गंमतीनं ‘टॅक्सी’ म्हणू लागले होते.

जेनिफर यांच्या निधनानंतर शशी कपूर खचले

शशी कपूर आणि जेनिफर यांचा संसार अनेक वर्षे आनंदात सुरू होता. मात्र, 1982 मध्ये कॅन्सरमुळे जेनिफर यांचं निधन झालं आणि शशी कपूर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. जेनिफर यांच्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. त्यांच्या निधनानंतर शशी कपूर पूर्णपणे खचले. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाणंही जवळपास बंद केलं होतं.

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?