AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंनी बोलावली खासदारांची बैठक

डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने खासदारांची बैठक बोलावली आहे.

डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंनी बोलावली खासदारांची बैठक
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 27, 2026 | 3:14 PM
Share

डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. डिलिमिटेशन विधयेकाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर आता ‘एनडीए’तील  घटक पक्षात घडामोडी वाढल्या आहेत. डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने खासदारांना वळवण्यासाठी भाजपला जुळवाजुळव करावी लागणार आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांची तातडीने बैठक बोलावली आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे हे सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनातील पक्षाची भूमिका आणि संसदीय कामकाजासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून 28 नोव्हेंबर रोजी शनिवारी दुपारी २ वाजता नंदनवन या शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात नेमकं काय?

डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकातील दुरुस्त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे सरसकट ५० टक्के जागा वाढवल्या जाणार आहेत. पंचवीस वर्षांपर्यंत मतदारसंघ पुनर्रचना करता येणार नाही. सध्या लोकसभेच्या जागा या 543 इतक्या आहेत. 50 टक्के जागा वाढल्यानंतर एकूण जागा 815 इतक्या होणार आहेत. तामिळनाडू राज्यात राज्यसभेच्या जागा 39 इतक्या आहेत. विधयेकाचं रुंपातर कायद्यत झाल्यानंतर तामिळनाडूतील लोकसभेच्या जागा 60 होतील. त्यामुळे या विधेयकाल स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष देखील मंजुरी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या सध्या एकूण 48 जागा आहेत. विधेयक मंजूर झाल्यानंतर 72 जागा होतील.

दरम्यान, डिलिमिटेशन बिलावरुन अनेक राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. समाजवादी पक्षानेही या विधेयकाला विरोध केला आहे. दक्षिणेतील डीएमके आणि बीआरएसने काही अटींवर पाठिंबा देणार असल्याचे संकेत दिल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. हे विधेयक संविधानावर आघात असल्याचे म्हटलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?