AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Remove tea stains: चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, वाचेल तुमचा वेळ

Remove tea stains: किचनमधील सर्वात कठीण काम म्हणजे चहाची गाळणी साफ करणं... चहाची गाळणी साफ करायला फार वेळ लागतो. पण काही टिप्स वापरल्यानंतर तुमचा वेळ वाचेल...

Remove tea stains: चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, वाचेल तुमचा वेळ
| Updated on: Nov 27, 2026 | 3:07 PM
Share

भारतीय घरांमध्ये चहा हा रोजच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, दररोज चहा बनवल्यानंतर गाळणी व्यवस्थित स्वच्छ न केल्यास तिच्या जाळीवर चहाच्या पानांमधील टॅनिन, धूळ आणि तेलकट अवशेष जमा होतात. त्यामुळे गाळणीची छिद्रे बंद होतात आणि चहा गाळताना अडचणी निर्माण होतात. एवढेच नाही, तर ओलसर आणि अस्वच्छ गाळणीवर जिवाणूंची वाढ होण्याची शक्यताही असते. अशा वेळी काही सोप्या घरगुती उपायांनी गाळणी पुन्हा स्वच्छ करता येते.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करुन तुम्ही चाहची गाळणी साफ करु शकता. एका भांड्यात समान प्रमाणात बेकिंग सोडा आणि पांढरा व्हिनेगर घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट गाळणीवर लावून काही वेळ ठेवा. त्यानंतर मऊ ब्रशने हलक्या हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवा.

उकळत्या पाण्याचा उपाय देखील प्रभावी ठरेल. स्टीलच्या गाळणीवर जाड थर जमा झाला असल्यास एका भांड्यात पाणी आणि एक चमचा बेकिंग सोडा घालून गाळणी सुमारे दहा मिनिटे उकळा. यामुळे अडकलेले चहाचे कण आणि तेलकट अवशेष सैल होण्यास मदत होते.

लिंबामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड काळे आणि तपकिरी डाग कमी करण्यास मदत करते. अर्ध्या लिंबाचा रस गाळणीवर लावून काही वेळ ठेवा. नंतर ब्रशने घासून धुवा. डिशवॉश लिक्विडचा वापर देखील  करु शकता.  कोमट पाण्यात डिशवॉश लिक्विड मिसळून गाळणी १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर जुन्या टूथब्रशने जाळी स्वच्छ करा.

जाळीच्या कोपऱ्यांमध्ये साचलेली घाण काढण्यासाठी थोड्या द्रव साबणात मीठ मिसळून हलक्या हाताने घासावे. मात्र, जाळी खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.प्लास्टिकच्या गाळणीला उकळत्या पाण्याचा वापर करू नये. त्याऐवजी कोमट पाणी, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस वापरावा.

दररोज चहा गाळल्यानंतर गाळणी लगेच साध्या पाण्याने धुणे ही सर्वांत महत्त्वाची सवय आहे. नियमित स्वच्छतेमुळे गाळणीवरील डाग आणि घाण साचण्यास प्रतिबंध होतो तसेच तिचे आयुष्यही वाढते.

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?