AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubh Yog: डिसेंबरच्या सुरुवातीलाच जुळून येणार दोन शुभ योग! ‘या’ राशींचे नशीब उजळणार?

डिसेंबरच्या सुरुवातीला 'गजकेसरी योग' आणि 'लक्ष्मी नारायण योग' हे दोन शुभ ग्रहयोग जुळून येणार आहेत. हे दोन शुभ योग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरतील याबद्दल जाणून घ्या.

Shubh Yog: डिसेंबरच्या सुरुवातीलाच जुळून येणार दोन शुभ योग! 'या' राशींचे नशीब उजळणार?
Shubh Yog
| Updated on: Nov 27, 2026 | 3:09 PM
Share

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना आणि त्यांच्या युतीतून निर्माण होणाऱ्या योगांना विशेष महत्त्व आहे. काही ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे तयार होणारे शुभ योग व्यक्तीच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आर्थिक प्रगती आणि मान-सन्मान घेऊन येतात, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. डिसेंबर २०२६ च्या सुरुवातीलाही असेच दोन महत्त्वाचे शुभ योग तयार होत आहेत. गजकेसरी योग आणि लक्ष्मी नारायण योग! या दोन्ही योगांमुळे काही राशींच्या जातकांसाठी प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया, हे योग नेमके कधी तयार होणार आणि कोणत्या राशींना त्याचा अधिक फायदा मिळू शकतो.

कधी तयार होणार गजकेसरी योग?

ज्योतिषीय गणनेनुसार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांनी चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीपासूनच देवगुरू बृहस्पती विराजमान असल्यामुळे चंद्र आणि गुरू यांच्या युतीतून गजकेसरी योग तयार होईल. या योगाचा प्रभाव २ डिसेंबर २०२६ पर्यंत राहणार असल्याचे सांगितले जाते.

लक्ष्मी नारायण योग कधी तयार होणार?

डिसेंबरच्या सुरुवातीला प्रभाव दाखवणारा दुसरा महत्त्वाचा योग म्हणजे लक्ष्मी नारायण योग. ज्योतिषीय गणनेनुसार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे तूळ राशीत हा योग तयार झाला आहे. २ डिसेंबरपर्यंत या योगाचा प्रभाव राहणार असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता, संवादकौशल्य आणि व्यापाराचा कारक मानला जातो. तर शुक्र हा धन, ऐश्वर्य, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती आर्थिक प्रगती आणि करिअरच्या दृष्टीने शुभ मानली जाते.

‘या’ पाच राशींना मिळू शकतो दोन्ही शुभ योगांचा फायदा!

ज्योतिषीय मान्यतेनुसार, डिसेंबरच्या सुरुवातीला तयार होणाऱ्या गजकेसरी आणि लक्ष्मी नारायण योगाचा विशेष सकारात्मक प्रभाव मेष, मिथुन, सिंह, तूळ आणि धनु या पाच राशींवर पडू शकतो. या राशींच्या जातकांसाठी आर्थिक लाभाच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळू शकते, तर व्यावसायिकांना रखडलेले व्यवहार पूर्ण करण्यात यश मिळू शकते. काही काळापासून अडकलेली कामे मार्गी लागण्याबरोबरच कौटुंबिक जीवनातही आनंद आणि समाधान अनुभवायला मिळू शकते. मात्र, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील ग्रहस्थितीनुसार या योगांचे परिणाम वेगवेगळे असू शकतात.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती वैदिक ज्योतिषशास्त्रातील मान्यता आणि उपलब्ध ज्योतिषीय गणनांवर आधारित आहे. याला निश्चित भविष्यवाणी किंवा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध तथ्य समजू नये. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही.) 

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?