CJP Protest Abhijeet Dipke : संघी, चड्डी घालणारे, चायवाला, मोदींचा एकेरी उल्लेख, अभिजीत दीपकेंच्या भाषणातील पाच महत्वाचे मुद्दे
CJP Protest Abhijeet Dipke : अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने आज दादर शिवाजी पार्क येथे आंदोलन केलं. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं. अभिजीत दीपके यांनी आपल्या भाषणातून मोदींनाच लक्ष्य केलं.

मला वाटतं गांधीजींना यापेक्षा मोठी श्रद्धांजली असू शकत नाही. आपल्या अधिकारांसाठी लढणं यापेक्षा मोठी श्रद्धांजली गांधीजींना असू शकत नाही. गांधीजींना जितका त्रास या इंग्रजांनी दिला नाही, तितकं या संघींनी आपल्याला हैराण केलय. या संघींना, चड्डी घालणाऱ्यांना वाटलेलं की, गांधींना गोळी मारुन संपवता येईल. पण इथे प्रत्येक गांधी आहे.
गांधी कधी मरत नाही. गांधी या देशाचा आत्मा आहे. जो पर्यंत या देशात गांधीसारखे लोक आहेत, तो पर्यंत गांधी जिवंत राहणार. गोडसे सारखे हजारो येतील, हजारो जातील. गोडसे डरपोक आहे. गांधी नसते तर आज हा देश नसता. आज या गोडसेच्या विचारधारावाल्यांना सांगतो. गांधी कधी संपणार नाहीत, संपू शकत नाहीत.
कोणी महामानव येईल बोलेल मी नॉन बायोलॉजिकल आहे. बोलण्याची गरज नाही. आम्हाला माहितीय तू माणूस नाहीयस. कोणी येणार बोलणार मी विश्वगुरु आहे. कोणता विश्वगुरु. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचा राष्ट्राध्यक्ष बोलतो नरेंद्र मोदी केम फ्रॉम लँड ऑफ महात्मा गांधी. हे नेहरु, गांधी, आंबेडकरांपेक्षा स्वत:ला मोठ बनण्याचा प्रयत्न करतायत. पण ते या जन्मा शक्य नाही.
गांधी, नेहरु, आंबेडकरांपेक्षा मोठं बनण्याची तुमची कुवत नाही. गांधी या देशाचा आत्मा असतील तर आंबेडकर भारताचा कणा आहेत.एकच असतं यांचं कुठल्याही परिस्थिती निवडणूक जिंकायची आहे. गांधी, आंबेडकर, नेहरु मोठे बनले ते त्यांच्या त्याग, बलिदानातून. आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार तेव्हा दिला जेव्हा लोकांना निवडणुका, विधानसभा, लोकसभा काय असतात हे सुद्धा माहित नव्हतं. ही त्यांची महानता आहे.
किती देशाला लुटणार? नोटबंदी करुन देशाला लाइनमध्ये लावलं. कोरोना वॅकसीनसाठी देशाला रांगेत उभं केलं. स्वत: काही करत नाही. आम्हाला फक्त लाइनमध्ये उभं करतो. 12 वर्षापासून काही चांगलं काम केलं नाही. सारखी चहा विकली, चहा विकली सांगतो. आम्ही सांगितलेल चहा विकायला. शाळेत जायचं, शिक्षण घ्यायचं नोकरी केली असती. अजून एक असतं गरीब मा का बेटा हूँ. देशातल्या सगळ्या मुलांना गरीब मा का बेटा बनवून ठेवलं.