AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | परीक्षा नाहीच, शाळा आताच नाही : उद्धव ठाकरे

"अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत याबाबत राज्यपालांनीही मला कळवले आहे. शाळाही आता सुरु होणार नाहीत (CM Uddhav Thackeray Saamana interview) .

Uddhav Thackeray | परीक्षा नाहीच, शाळा आताच नाही : उद्धव ठाकरे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 25, 2020 | 9:49 AM
Share

मुंबई : “अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत याबाबत राज्यपालांनीही मला कळवले आहे. शाळाही आता सुरु होणार नाहीत (CM Uddhav Thackeray Saamana interview) . अन्यत्र शाळा सुरु होऊन मुलांना बाधा होऊ शकते. मुंबईच्या रस्त्यावर वडापाव लवकरच मिळेल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राच्या मुलाखतीत सांगितले. सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यातील कोरोना स्थिती आणि विरोधकांवर आपले मत मांडले (CM Uddhav Thackeray Saamana interview) .

उद्धव ठाकरे म्हणाले, “अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत याबाबत राज्यपालांनीही मला कळवले आहे. शाळाही आता सुरु होणार नाहीत. अन्यत्र शाळा सुरु होऊन मुलांना बाधा होऊ शकते. शाळा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु होणार असे विचारा. मी निर्णय घेताना टीकेची पर्वा करत नाही, बरोबर वाटेल ते करतोच, परीक्षा व्हावी असे मलाही वाटते, पण परिस्थिती तशी नाही. तिस-या वर्षांच्या मुलांना सरासरी मार्क देऊन अडथळे दूर केले आहेत. सरासरी मार्क नको असलेल्यांना परीक्षेचाही पर्याय उपलब्ध आहे.”

“मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव लवकरच मिळेल. WHO ने धारावीचं उदाहरण साऱ्या जगाला दिले आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही मुंबईत लपवाछपवी नाही असं म्हंटलं आहे. विरोधक काय म्हणतायत त्याकडे लक्ष देत नाही. देवच म्हणतोय मी तुमच्यातच आहे, मंदिरात येऊ नका. लॉकडाऊन आहेच, एकेक गोष्टी सोडवत आहे”, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

“घाईघाईन लॉकडाऊन लावणे आणि उठवणे चूक ठरु शकते. घिसाडघाईनं लॉकडाऊन उठवले न् साथ पसरली तर जीव जातील. “जीव गेला तरी बेहत्तर लॉकडाऊन उठवा” याची आहे का तयारी ? मी म्हणजे ट्रम्प नाही, डोळ्यासमोर माझी माणसे तडफडू देणार नाही. लॉकडाऊनच्या विरोधकांनी एकदा काय ते ठरवावे. लॉकडाऊन उठवले तर घरंच्या घरं रिकामी होऊन टाळे लागतील. अख्खे कुटुंबच मरण पावले तर घराचे टाळे कोण उघडणार ?”, असा प्रश्नही यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

“लसीचे प्रयोग सुरु झालेत, काही महिन्यात लस येईल म्हणत आहेत. डिसेंबर अखेर देशात लस उपलब्ध होईल असं सध्या चित्र आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“दूध उत्पादकच काय, कुणाच्याच मालाला भाव मिळेना, सगळेच लोक अन्याय होतोय म्हणत असतील तर ते योग्य नाही. केंद्राची 38 हजार कोटींची मदत हळूहळू येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारचेही उत्पन्न घटलेले आहे. महसूल वाढवायचा तर कोणाकडून वसूल करावा सांगा ? सध्या तरी “पी हळद अन् हो गोरी’ असा उपाय नाही”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

Uddhav Thackeray | भाजपने फंड दिल्लीला दिलाय, फडणवीसांना दिल्लीची चिंता : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात बैठक, रायगडच्या वादावर चर्चा, मात्र राज्यात एकत्र लढण्याच्या हालचाली

Follow Us
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान