Uddhav Thackeray | भाजपने फंड दिल्लीला दिलाय, फडणवीसांना दिल्लीची चिंता : उद्धव ठाकरे

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोले लगावले (CM Uddhav Thackeray Saamana interview).

Uddhav Thackeray | भाजपने फंड दिल्लीला दिलाय, फडणवीसांना दिल्लीची चिंता : उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 25, 2020 | 9:23 AM

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोले लगावले (CM Uddhav Thackeray Saamana interview). देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदार फंड दिल्लीत दिला आहे. ते सर्व गोष्टी दिल्लीतच करत आहेत. त्यांना दिल्लीचीच चिंता आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या दिल्ली भेटीला कोपरखळी लगावली. यावेळी त्यांनी ही वेळ राजकारण करण्याची नसून एकदिलाने काम करण्याची असल्याचंही म्हटलं.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्लीत जाऊन आल्याची आठवण करुन दिली. यावर उद्धव ठाकरे यांनी ते दिल्लीतील कोरोनाची पाहणी करण्यासाठी गेले असतील असं म्हटलं. तसेच ते सध्या प्रत्येक गोष्ट दिल्लीत करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा आमदाराकीचा फंडही दिल्लीतच दिल्याचं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला.

“विरोधक विमानाने न जाता बैलगाडीतून का जात नाही?”

उद्धव ठाकरे म्हणाले, “तंत्रज्ञान उपलब्ध असून उपयोग न करणं दुर्भाग्यपूर्ण आहे. मी घराबाहेर पडत नाही, असा आरोप करणारे विमानातून न जाता बैलगाडीतून का जात नाही. जर तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा नाही, तर मग शोध का लावतात?”

“आता तंत्रज्ञान प्रचंड विकसित आहे. कोरोनाच्या संसर्गाचाही धोका आहे. त्यामुळे मंत्रालयही बंद आहे. काम करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही. मी घरात बसूनही राज्य हाकता येतं. मी घरातून निर्णय घेत आहे. प्रत्यक्ष भेटीमध्ये फक्त एकाच ठिकाणी जाता येते, आता एकाचवेळी अनेक ठिकाणी जात आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

“जनता माझ्या सोबत असल्याने मला कोणताही ताण-तणाव नाही”

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी जनतेशी माझा संबंध दुरावू दिला नाही. जनता माझ्या सोबत असल्याने मला कोणताही ताण-तणाव नाही. जनतेचा माझ्यावर आशिर्वाद माझ्यावर आहे. त्यामुळे मला कुठलीही चिंता नाही. मी जनतेच्या आरोग्याची काळजी करत काम करत आहे. मी मुख्यमंत्री झालो आणि जागतिक आणीबाणीच आली. कोरोनाबरोबर जगायला सगळ्यांनीच शिकायला हवे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे :

  • मी जनतेशी माझा संबंध दुरावू दिलो नाही
  • जनता सोबत असल्याने मला ताण-तणाव नाही
  • 3-4 महिने मी स्वतःच माझे केस कापत आलो
  • वैद्यकीय शास्त्र हा माझ्या कुतूहलाचा विषय
  • मला नेहमी वाटायचे, आपण डॉक्टर व्हावे
  • मी होमिओपॅथीचा जरुर अभ्यासही केला
  • त्यावेळी आत्ताच्यासारखे उपद्व्यापी वायरस नव्हते
  • बीडचा प्लेग, मुंबईतल्या पावसावेळी आरोग्यविषयक मदत केली
  • मी मुख्यमंत्री झालो अन् जागतिक आणीबाणीच आली
  • कोरोनाबरोबर जगायला सगळ्यांनीच शिकायला हवे
  • ठाकरे सरकार म्हणायला ठीक, पण हे जनतेचे सरकार
  • मुख्यमंत्रीपदाचे 6 महिने फार विचित्र गेले

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सध्या विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धुमधडाक्याने साजरे होत आहेत. नैसर्गिक आपत्ती येतात, जातातही. कोरोनाचं तसं नाही. कोरोनाचं युद्ध हे खऱ्या अर्थाने विश्वयुद्ध आहे. लॉकडाऊन उठवलेल्या देशांनी पुन्हा लॉकडाऊन लावले. महाराष्ट्रात सैन्य बोलावण्याची वेळ कधीच आली नाही. महाराष्ट्रानेही चीनप्रमाणे 15-20 दिवसांत हॉस्पिटल्स उभारले आहेत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

हिंमत असेल तर सरकार पाडा” मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनंतर आता संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंशी ‘सामना’

फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार

CM Uddhav Thackeray Saamana interview

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.