AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंमत असेल तर सरकार पाडा” मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला हिंमत असेल तर माझी मुलाखत सुरु आहे, सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान दिलं आहे (CM Uddhav Thackeray challenge BJP).

हिंमत असेल तर सरकार पाडा मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला
| Updated on: Jul 24, 2020 | 10:30 AM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांना हिंमत असेल तर माझी मुलाखत सुरु आहे, सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान दिलं आहे (CM Uddhav Thackeray challenge BJP). सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “मी इथं बसलो आहे, हिंमत असेल तर मुलाखत सुरु असताना सरकार पाडा.” ही मुलाखत सामनाकडून शनिवारी (25 जुलै) आणि रविवारी (26 जुलै) प्रसारित केली जाणार आहे. त्यापूर्वी संजय राऊत यांनी या मुलाखतीचा ट्रेलर ट्विट केला आहे. यात मुख्यमंत्री आक्रमकपणे विरोधकांना सडेतोड उत्तरं देताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील अनेकांना उत्सुकता आहे. संजय राऊत यांनी मुलाखतीचा ट्रेलर टाकल्यानंतर या मुलाखतीची उत्सुकता आणखीच वाढल्याचं दिसत आहे. या ट्रेलरमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरे यांना विरोधक महाविकासआघाडी सरकारला तीनचाकी सरकार, रिक्षा म्हणत असल्याचा मुद्दा उपस्थित करतात. यावर उद्धव ठाकरे यांनी केंद्रात मोदी सरकारसोबत आलेल्या मित्रपक्षांच्या संख्येवर बोट ठेवत केंद्रात किती चाकी सरकार आहे? असा प्रतिप्रश्न विचारला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

यावेळी त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केलं. आज तुम्हाला चीन नको आहे, मात्र पुढे जाऊन कालांतराने भारत-चिनी भाईभाई होणार नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवरच निशाणा साधला.

मी वयाच्या साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो असलो तरी “याच’साठी’ केला होता अट्टाहास” असं नाही. हा केवळ योगायोग आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. तसेच काहीजण विरोधी पक्षनेतेपदही साजरं करत आहेत, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावाल. या संपूर्ण मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक विषयांवर सडेतोड टोलेबाजी पाहायला मिळणार असल्याचं या ट्रेलर्सवरुन दिसत आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, या आधीच्या टीझरमध्ये “मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही. माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत. या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा, लॉकडाऊन या विषयांवर सविस्तर भाष्य केलं आहे (CM Uddhav Thackeray says I am not Donald).

उद्धव ठाकरे अंतिम वर्षाच्या परीक्षेवरदेखील उत्तर देताना दिसत आहेत. मात्र, त्यांचं सविस्तर उत्तर संपूर्ण मुलाखत प्रदर्शित झाल्यावरच बघायला मिळेल. “सरकार म्हणून आम्ही परीक्षा घेणार. परीक्षा व्हावी असं माझंही मत आहे. पण…” असं म्हणताना दिसत आहेत.  उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत लॉकडाऊनवरही भाष्य केलं आहे. “राज्यात लॉकडाऊन सुरुच आहे. आपण एक-एक गोष्टी सोडवत चाललो आहोत”, असं ते म्हणाले.

हेही वाचा :

मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही, माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही : उद्धव ठाकरे

Jai Bhavani Jai Shivaji | छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान, भाजपचं तोंड बंद का? : संजय राऊत

CM Uddhav Thackeray challenge BJP

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...