AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cockroach Janata Party : अभिजीत दिपके यांची सर्वात मोठी घोषणा, जतंर मंतरवरील आंदोलनानंतर पुढचा प्लॅन काय? आता थेट..

शनिवारी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन झालं. या आंदोलनानंतर अभिजीत दिपके हे आपल्या घरी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Cockroach Janata Party : अभिजीत दिपके यांची सर्वात मोठी घोषणा, जतंर मंतरवरील आंदोलनानंतर पुढचा प्लॅन काय? आता थेट..
Cockroach Janata PartyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 5:02 PM
Share

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुणाई ही झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील तरुण असलेल्या अभिजीत दिपके नावाच्या तरुणाने कॉक्रोच जनात पार्टीची स्थापना केली. या पक्षाची अद्याप अधिकृत कुठेही नोंद नाही. परंतु सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉक्रोच जनता पार्टीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.  अवघ्या काही दिवसांमध्ये या पार्टीच्या फॉलोवर्सची संख्या कोटींच्या घरात पोहोचली. दरम्यान आतापर्यंत या पार्टीचं सर्व काम हे ऑनलाईन पद्धतीनेच सुरू होतं. परंतु शनिवारी मात्र थेट कॉक्रोरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यात आलं.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे अमेरिकेमध्ये होते. ते अमेरिकेमधून शनिवारी थेट दिल्ली विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर आंदोलकांनी जतंर मंतरवर आंदोलनाची परवानगी मागितली. पोलिसांकडून देखील आंदोलनाची परवानगी देण्यात आली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतरवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भारतीय तरुणाईचे विविध प्रश्न हाती घेऊन दिल्लीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान या आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे त्यांच्या छत्रपती  संभाजीनगरमधील घरी पोहोचले आहेत. दरम्यान त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता मी पुन्हा कधीही अमेरिकेला जाणार नाही, भारतामध्येच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आमचा पक्ष कधीही कोणत्या राजकीय पक्षाशी जोडला जाणार नाही, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आंदोलानंतर त्यांनी आपला पुढचा प्लान देखील सांगितला आहे, आता संपूर्ण देश फिरण्याच्या प्लॅनवर विचार करत आहोत, असं यावेळी अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.  दरम्यान पालकांनो आपल्या मुलांना अडवू नका, त्यांना सिस्टमविरोधात आवाज उठवू द्या, असं आवाहान देखील त्यांनी यावेळी केलं आहे.  ज्यांना युवकांची काळजी आहे, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात, असंही यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे. .

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात