AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी बारावीला अत्यंत कमी मार्क्स, CET मध्ये 100 पर्सेंटाईल्स कसे, काँग्रेस नेत्याचा सवाल; केली मोठी पोलखोल

१२ वी सायन्सनंतर अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अशा पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यात MH – CET परिक्षा घेतली जाते. मात्र त्यातही घोटाळा झाल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी केला आहे.

दहावी बारावीला अत्यंत कमी मार्क्स,  CET मध्ये 100 पर्सेंटाईल्स कसे, काँग्रेस नेत्याचा सवाल; केली मोठी पोलखोल
Sachin sawant
| Updated on: May 19, 2026 | 4:41 PM
Share

देशभरात (NEET) पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर जर तरुणपिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूकच आहे. NEET पेपरफुटीची चौकशी सुरु असली तरी अशा प्रकारच्या चौकशीतून पुढे काहीही निष्पन्न होत नाही हा आजवरचा अनुभव आहे. नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा सनसनाटी आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. दहावी बारावीला जेमतेम ३५-४० टक्के मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांना MH – CET मध्ये १०० पर्सेंटाईल्स पडलेले आहेत, हा घोटाळा असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींनी कठोर शिक्षा करा अशीही मागणी सावंत यांनी केली आहे.

२२ विद्यार्थ्यांना एमएच सीईटीमध्ये मात्र १०० पर्सेंटाईल

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, MH – CET परिक्षेचा अभ्यासक्रम हा ११-१२ वीचा असतो, १० वी १२ परिक्षेत जेमतेम मार्क्स मिळवलेल्या २२ विद्यार्थ्यांना एमएच सीईटीमध्ये मात्र १०० पर्सेंटाईल मिळालेले आहेत. ज्या विद्यार्थ्याला १० व्या परिक्षेत ३७ टक्के मार्क्स मिळाले त्याला एमएच सीईटमध्ये ९९.९७१ टक्के पर्सेंटाईल मिळाले आहेत. बारावीत ज्यांना ५१ टक्के मार्क्स मिळाले अशा दोन विद्यार्थ्यंना एमएच सीईटमध्ये १०० पर्सेंटाईल, ४५ टक्के मार्क्स पडलेल्याला १०० पर्सेंटाईल आणि ३९ टक्के मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्याला १०० पर्सेंटाईल पडलेले आहेत. बारावीला ज्या विद्यार्थ्याला ३५ मार्क्स पडले त्यालाही १०० पर्सेंटाईल पडले आहेत.

MHT-CET गणितात १०० पर्सेंटाइल मिळवलेल्या रँक 1, 2, 3, 4, 5, 6, 15, 16, 17 आणि 18 या सर्व विद्यार्थ्यांचे HSC गणितातील सरासरी गुण फक्त 64.3% होते. या राज्यातील दहा अव्वल विद्यार्थ्यांपैकी सहा जणांचे गुण या सरासरीपेक्षाही कमी होते — त्यांचे HSC गणितातील गुण अनुक्रमे 60, 54, 53, 53, 40 आणि 35 होते.  CET मधील टॉप 20 रँकर्सपैकी 6 विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत 60% पेक्षाही कमी गुण मिळाले. रँक 1, 2, 5, 12, 15 आणि 18 — ज्यांचे CET पर्सेंटाइल 99.99 किंवा त्यापेक्षा जास्त आहे — यांना HSC PCM मध्ये 60% पेक्षा कमी गुण मिळाले.

MH – CET परिक्षेवर नियंत्रण कोणाचे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी उत्तर द्यावे ? अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

एका टॉपरला CET गणितात 100 पर्सेंटाइल मिळाले, पण बोर्डातील एकूण PCM गुण फक्त 39% होते. टॉप 20 मधील 10 विद्यार्थ्यांना CET गणितात परफेक्ट 100 पर्सेंटाइल मिळाले. मात्र त्यांच्या HSC गणितातील गुण 35 ते 97 या दरम्यान आहेत — म्हणजे तब्बल 62 गुणांचे अंतर. एका ला CET गणितात 100 पर्सेंटाइल, पण HSC गणितात फक्त 35% गुण — म्हणजे 65 गुणांचे अंतर. HSC, PCM मध्ये फक्त 39% गुण असूनही राज्यातील टॉप 20 मध्ये स्थान मिळाले आहे.

CET आणि HSC या दोन्हींच्या मूल्यमापन पद्धतींमध्ये मोठी विसंगती

रँक 66 चा डेटा देखील गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे. या विद्यार्थ्याला १० वीला गणितात २२ मार्क्स मिळाले होते, तर १२ वी ३३ मार्क्स मिळाले म्हणजे तो गणितात सपशेल नापास आहे, पीसीएम मध्ये ४७.६७ टक्के मार्क्स आहेत त्याला सीईटी मध्ये मात्र ९९.९७१ पर्सेंटाईल मिळाले आहेत. CET मध्ये अत्यंत उच्च पर्सेंटाइल मिळवूनही बोर्ड परीक्षेतील कामगिरी त्याच प्रमाणात दिसत नाही. अशा उदाहरणांमुळे CET आणि HSC या दोन्ही मूल्यमापन पद्धतींमध्ये मोठी विसंगती असल्याचे अधिक स्पष्ट होते. हा चमत्कार कसा झाला, याचे उत्तर उच्च व तंज्ञ शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी द्यावे. तसेच या परिक्षा कोण नियंत्रित करतो, या परिक्षांवर जोशी नामक व्यक्तीचा काय संबंध आहे, याचाही खुलासा केला पाहिजे, असे सावंत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परिक्षा पे चर्चा’मध्ये दरवर्षी मोठे प्रवचन देत असतात पण त्यांच्याच कार्यकाळात ‘व्यापम’ सारखे परिक्षा घोटाळे फोफावत आहेत ही चिंतेची बाब आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या राज्यातच परिक्षेत गडबड घोटाळे वाढले आहेत. त्या घोटाळ्यातील लोकांचे संबध भाजपा नेत्यांशी असल्याचे उघड झाले आहेत. एमएच सीईटीच्या परिक्षेतील घोटाळ्यावर मी एक्स या सोशल मीडियावरून एक पोस्ट केली होती, त्यावर या परिक्षा घेणाऱ्या सेलकडून यादी अस्पष्ट आहे असा खुलासा करण्यात आला आहे. या यादीतीला विद्यार्थ्यांची नावे सार्वजनिक होऊ नयेत म्हणून ती झाकण्यात आली होती असे सावंत यांनी सांगितले.

आता मी पुन्हा एमएच सीईटी कमिशनला एक यादी आणि पत्र देणार आहे, त्यावर त्यांनी खुलासा करावा. एमएचसीईट परिक्षा सेलमध्ये मागील ८-१० वर्षे तेच अधिकारी काम करत असून त्यांच्या बदल्याही झालेल्या नाहीत. नीट, एमएच-सीईट सारख्या परिक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्य ठरवणाऱ्या असतात त्यात अशा प्रकारे घोटाळे करून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका असेही सचिन सावंत यावेळी म्हणाले.

Follow Us
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा