CJI Suryakant : राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सर्वोच्च न्यायालयावर धडकण्याआधी CJI सूर्यकांत यांचं महत्वाच वक्तव्य
CJI Suryakant : काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार आज सर्वोच्च न्यायालयावर धडकणार आहेत. SIR च्या प्रक्रियेला विरोध आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा या दोन विरोधी पक्षांच्या मुख्य मागण्या आहेत.

देशाचे मुख्य सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी फेटाळून लावली आहे. राहुल गांधी यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. पण सरन्यायाधीशांनी अशी भेट देण्यास नकार दिला आहे. राहुल गांधी यांना ज्या मुद्यावर भेटायचं आहे, ते खटले आधीच सर्वोच्च न्यायालयात आहेत असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. “प्रत्येक भारतीय नागरिकाला आमच्याकडे येण्याचा अधिकार आहे. कायदा-सुव्यवस्थेचा जो विषय आहे, त्यावर आम्ही आमच्यावतीने सुनावणी करु. ज्याचा जो अधिकार आहे तो त्याला देऊ” असं सीजेआय सूर्यकांत म्हणाले. राहुल गांधी यांनी स्पेशल इंटेंसिव रिविजनच्या (SIR) मुद्यावर चर्चेसाठी वेळ मागितला होता.
सरन्यायाधीशांच्या कार्यालयाने ई-मेल द्वारे त्यांना उत्तर दिलं आहे.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलेलं की, विरोधी पक्षांनी सीजेआय सूर्यकांत यांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता. काँग्रेस इंडिया आघाडीने आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार आहे. जे विषय आधीच सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहेत, त्यावर चर्चा करणं योग्य नाही असं सीजेआयचं म्हणणं आहे.
सर्वोच्च न्यायालयात येण्यासाठी स्वतंत्र
संवैधानिक व्यवस्थेनुसार सर्वोच्च न्यायालय कार्यपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात दखल देऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणाले. पण विरोधी पक्ष कुठल्याही मुद्यावर न्यायिक बाजूने सर्वोच्च न्यायालयात येण्यासाठी स्वतंत्र आहे. विरोधी पक्षाचे नेते याचिका दाखल करु शकतात. मंगळवारी SIR प्रक्रियेशी संबंधित मुद्यांवर सुनावणी होऊ शकते.
सीजेआयला कुठला अर्ज देणार?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सातत्याने आंदोलनं करणाऱ्या काँग्रेस पार्टीने सोमवारी सुप्रीम कोर्टावर मोर्चा घेऊन जाण्याची घोषणा केली आहे. इंडिया ब्लॉकने सुप्रीम कोर्टापर्यंत मार्च करणार अशी घोषणा केलीय. ते सीजेआयला लिखित अर्ज देतील. या अर्जात SIR पुन्हा मागे घेणं, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी असेल. शुक्रवारी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढला होता. राष्ट्रपती भवनात जाऊन 10 नेत्यांनी राष्ट्रपतींना अर्ज दिला होता.