उस्मानाबादेतील हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी उरुस रद्द

कोरोनामुळे हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी यांचा 715 वा वार्षिक उरुस रद्द करण्यात आला आहे.

उस्मानाबादेतील हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी उरुस रद्द
Follow us
| Updated on: Mar 07, 2020 | 7:04 PM

उस्मानाबाद : जगभरात हाहा:कार माजवलेल्या कोरोना (Corona Affect Osmanabad Urus) विषाणूचा आता भारताततील धार्मिक गोष्टींवरही परिणाम होऊ लागला आहे. अजमेरनंतर दक्षिण भारतातील सर्वात मोठा दर्गा म्हणून उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी दर्गा ओळखला जातो. मात्र, कोरोनामुळे हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी यांचा 715 वा वार्षिक उरुस रद्द करण्यात आला आहे.

या उरुसमध्ये धार्मिक कार्यक्रम होणार असून (Corona Affect Osmanabad Urus) सांस्कृतिक कार्यक्रम आणि जत्रा होणार नाहीत, असा निर्णय जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी घेतला. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी बैठकीअंती हा निर्णय घेतला.

हेही वाचा : कोरोना इफेक्ट : हात मिळवण्यास आलेल्या व्यक्तीसमोर शरद पवारांनी हात जोडले

जिल्हाधिकारी, वक्फ बोर्ड, उरुस कमिटी सदस्य आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील प्रमुख उरुसपैकी एक असलेल्या या उरुसला 8 मार्चपासून सुरुवात होणार होती. मात्र, आता तो होणार नाही.

या उरुसचे आणि देवस्थानचे वैशिष्ट्य म्हणजे, या उरुससाठी हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हजरत ख्वाजा यांचे भक्त जगभरात असून उरुसमध्ये हिंदू धर्मासह मुस्लिम समाजाला विविध धार्मिक विधीचे मानपान आहे.

हजरत ख्वाजा यांच्या उरुससोबतच तुळजापुरातील सर्व धार्मिक कार्यक्रम, जत्रा या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, तुळजापूरचं दैवत तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात जनजागृतीचे बोर्ड लावण्यात आले आहेत. शिवाय, मंदिर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती (Corona Affect Osmanabad Urus) जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी दिली.

संबंधित बातम्या :

कोकणातील मासेमारी व्यवसायाला कोरोनाचा विळखा, निर्यात 40 टक्क्यांनी घटली

वाशिममध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनोखी जनजागृती

कोरोनाचा बॉलिवूडला विळखा, आयफा सोहळा पुढे ढकलला, वरुण धवनचं विवाहस्थळ बदलणार?

कोरोनाची धास्ती, मंदिरात दर दोन तासांनी साफ-सफाई, संसर्ग रोखण्यासाठी तीर्थक्षेत्रांकडून विशेष दक्षता

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.