AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Temple Closed | पंढरपूर, शिर्डीसह राज्यातील 15 मोठी मंदिरं बंद

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर आज पहाटे 5 वाजता विधिवत पूजा करून भाविकांसाठी दर्शनासाठी बंद करण्यात आले.

Temple Closed | पंढरपूर, शिर्डीसह राज्यातील 15 मोठी मंदिरं बंद
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 17, 2020 | 1:57 PM
Share

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाची ठिकाणं बंद करण्यात येत आहेत. राज्यातील अनेक मंदिरं खबरदारीसाठी (Corona Effect Temple Closed) बंद करण्यात येत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डीचं साई मंदिर यासह राज्यातील सर्व मोठी मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई (Corona Effect Temple Closed) तुळजाभवानी देवीचे मंदिर आज पहाटे 5 वाजता विधिवत पूजा करून भाविकांसाठी दर्शनासाठी बंद करण्यात आले. आजपासून देवीचे मंदिर सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. तुळजाभवानी देवीची (Corona Effect Temple Closed) चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.

देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक विधी आणि पूजा या महंत आणि पुजारी यांच्याकडून केल्या जाणार आहेत. कोरोना आजारामुळे गर्दी टाळण्यासाठी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : Corona | रुग्णांचा विलगीकरणाचा संपूर्ण खर्च सरकारचा, हॉटेलमध्येही राहण्याची व्यवस्था : उद्धव ठाकरे

आज पहाटे 5 वाजता देवीची पूजा करण्यात आली आणि त्यांनतर सर्व भक्तांच्या वतीने देवीच्या मूर्तीवर एक अभिषेक घालण्यात आला. कोरोना आजार दूर व्हावा यासाठी देवीला साकडे घालण्यात आले.

कोरोनाचा वाढता धोका पाहता राज्यातील गर्दी होईल अशी सर्व ठिकाणं बंद करण्याच्या सूचना सरकारने केल्या. त्यानंतर राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिर संस्थानांनी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या पुढील आदेशापर्यंत राज्यातील अनेक मंदिरं हे (Corona Effect Temple Closed) बंद राहणार आहेत.

राज्यातील कुठली मंदिरं बंद राहणार?

  1. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर – पंढरपूर
  2. साई बाबा मंदिर – शिर्डी
  3. सिद्धिविनायक मंदिर मुंबई
  4. गणपती मंदिर – गणपतीपुळे
  5. अंबाबाई मंदिर – कोल्हापूर
  6. तुळजाभवानी मंदिर – तुळजापूर
  7. गजानन महाराज मंदिर – शेगाव
  8. खंडोबा मंदिर – जेजुरी
  9. मुंबादेवी मंदिर – मुंबई
  10. एकविरा देवी – कार्ला
  11. महालक्ष्मी मंदिर – सारसबाग
  12. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर – पुणे
  13. प्रभू वैद्यनाथा मंदिर – परळी, बीड
  14. कसबा गणपती – पुणे
  15. दत्त मंदिर – श्री क्षेत्र नृसिंहवाडी

शिवाय, राज्यातील काही मंदिर संस्थानांनी मंदिरं पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. शेगावच्या संत गजानन महाराजांचा रामनवमी उत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र, गजानन महाराजांचे मंदिर हे भक्तांसाठी सुरु राहणार असल्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे.

तर, पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अन्नछत्र बंद करण्यात आले आहे. भिवंडी शहरातील अय्यपा मंदिरचा 12 वा वर्धापन दिन सोहळा कोरोना (Corona Effect Temple Closed) विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 9
  • पुणे – 7
  • मुंबई – 6
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • एकूण 39

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • एकूण – 39 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

संबंधित बातम्या :

ताश्कंदमध्ये भारतीय प्रवासी अडकले, शरद पवारांकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र

Corona : दिल्लीत कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण बरा, कोरोनाला कसे हरवले? लढाई जिंकणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी

कोरोनावर उपाय सुचवा आणि 1 लाख जिंका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट

मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या भाऊ-वहिनीला कोरोनाची लागण, अधिकारीही टेस्टसाठी कस्तुरबात दाखल

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!