AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : दिल्लीत कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण बरा, कोरोनाला कसे हरवले? लढाई जिंकणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात दहशत पसरवली (Corona positive recovered delhi) आहे.

Corona : दिल्लीत कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण बरा, कोरोनाला कसे हरवले? लढाई जिंकणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी
| Edited By: | Updated on: Mar 16, 2020 | 11:15 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात दहशत पसरवली (Corona positive recovered delhi) आहे. याची लागण भारतातही अनेकांना झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. याचदरम्यान एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दिल्लीमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरा झालेला (Corona positive recovered delhi) आहे.

“घाबरु नका. हा देश आपल्या तरुणांचा देश आहे. आपण नमस्ते करणारी लोकं आहोत. प्रत्येक गोष्टीला ठिक करण्यासाठी थोडा वेळ लागतो”, असं कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाने टीव्ही 9 शी बोलताना सांगितले.

प्रश्न : तुम्हाला कोरोनाची लागण कशी झाली?

उत्तर : तुम्हाला कोरोनाची लागण झालेले लगेच कळत नाही. मी 16 तारखेला इटलीला गेलो होतो आणि 21 तारखेपर्यंत तिथे होतो. 21 ला मी बुडापेस्टला गेलो. मी तिथे मेट्रो ट्रेनमध्ये फिरलो आणि खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेलो. तसेच अनेक ठिकाणी भेट दिली, अशामध्ये मला समजले नाही कोरोनाची लागण केव्हा आणि कुठे झाली.

प्रश्न : जेव्हा तुम्हाला आयसोलेशनमध्ये ठेवले तेव्हा कोणत्या प्रक्रियेतून तुम्ही गेला?

उत्तर : 29 तारखेला मी स्वत: डॉक्टरकडे गेलो. मला ताप होता. डॉक्टरांनी मला औषध दिले. मी त्यांना सांगितले की, मी इटलीला गेलो होतो. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, सर्व ठिक आहे. कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. यानंतर मी राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेलो आणि टेस्टसाठी सॅम्पल दिले. टेस्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला बोलावले आणि सांगितले की, तुम्हाला कोरोना झाला आहे. तो लवकरच बरा होईल. काळजी करु नका. त्यानंतर मला 14 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवले. आयसोलेशनसाठी एक मोठी रुम आहे. ज्यामध्ये सर्व सोयी सुविधा आहेत.

प्रश्न : जेव्हा डॉक्टर आणि नर्स तुम्हाला दिलेल्या रुममध्ये येत होते तेव्हा ते किती सावधानी बाळगत होते?

उत्तर : डॉक्टर आणि नर्स जे कुणी माझ्याजवळ येत होते. त्या सर्वांनी प्रोटेक्टिव्ह कपडे घातले होते. डॉक्टर प्रत्येकवेळी नवीन कपडे घालून येत होते. एकदा भेटल्यावर ते जुने कपडे बाजूला ठेवत. डॉक्टरांकडून खूप सावधानी घेतली जात होती. अशी सुविधा घरातही मिळत नव्हती.

प्रश्न : रुग्णालयातून सोडल्यावर तुम्हाला काय काळजी घेण्यास सांगितली?

उत्तर : मी माझ्या घरात एक रुममध्ये आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व गोष्टींचे पालन करत आहे. मी अजून माझ्या घरातून बाहेर निघालो नाही.

प्रश्न : तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मुलांसोबत घरात कसे राहता आणि काय काळजी घेता?

उत्तर : घरातील लोक एकमेकांच्या जवळ जात नाहीत. घरातील लहान मुलांना माझ्या रुममध्ये येण्याची परवानगी नाही. मी ज्या बाथरुमचा वापर करत आहे त्याचा वापर इतर कुणी करत नाही.

प्रश्न : तुम्ही जिथे राहता तेथील शेजारच्यांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे, दिनक्रमात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे?

उत्तर : आम्ही फ्लॅटमध्ये राहत आहे. येथे कसलाही भेदभाव नाही. पण अनेकजण घाबरले आहेत. आम्ही कोणतेही सामान मागितले तर लोक घराच्या बाहेर ठेवून जात आहेत.

प्रश्न : काही लोक कोरोनाच्या चाचणीपासून पळ काढत आहेत. आयसोलेशनचे नाव ऐकून घाबरत आहेत, तर अशामध्ये तुम्ही लोकांना काय सांगाल?

उत्तर : मी लोकांना हेच सांगेल की, डॉक्टरांकडे जा टेस्ट करा, सरकार तुम्हाला मदत करेल. सरकार घरी येऊन तुमची चौकशी करत आहे. तुम्हाला आयसोलेशनला घाबरुन जाण्याची गरज नाही. सरकार खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.