AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू

राजेंद्र गायकवाड दुपारी आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेले असताना पाय घसरुन विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. (Cricketer Ajinkya Rahane Maternal Uncle Dies in Sangamner)

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू
| Updated on: May 21, 2020 | 8:08 AM
Share

शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यात विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मयत शेतकरी राजेंद्र राधाकृष्ण गायकवाड हे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे याचे मामा होते. (Cricketer Ajinkya Rahane Maternal Uncle Dies in Sangamner)

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावात काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजेंद्र गायकवाड दुपारी आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेले असताना पाय घसरुन विहिरीत पडल्याचा अंदाज आहे.

गायकवाड मोटार सुरु करण्यासाठी शेतात गेले होते, मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परत न आल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरातील काही व्यक्तींनाही विचारणा करण्यात आली.

बराच वेळ शोध घेऊनही ते सापडत नव्हते. शोध घेताना काही जणांनी शेतातील विहिरीजवळ त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला. संशय म्हणून एकाने विहिरीत डोकावून पाहिले असता राजेंद्र गायकवाड यांची चप्पल तिथे पडलेली दिसली. त्यानंतर गायकवाडही विहिरीत पडलेले दिसले.

गावकरी आणि नातेवाईकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

बुधवारी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबासह संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

(Cricketer Ajinkya Rahane Maternal Uncle Dies in Sangamner)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.