AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयडियाची कल्पना, ज्वेलरीचं दुकान लुटण्यासाठी चोरांनी लढवली अशी शक्कल, तुम्हीही डोक्यावर माराल हात

गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आता देखील अशी चोरी झाली आहे. जाणून तुम्हीही डोक्यावर हात द्या... ज्वेलरीचं दुकान लुटण्यासाठी चोरांनी अशी शक्कल लढवली ज्यामुळे मालकाला मोठा धक्का बसला...

आयडियाची कल्पना, ज्वेलरीचं दुकान लुटण्यासाठी चोरांनी लढवली अशी शक्कल, तुम्हीही डोक्यावर माराल हात
| Updated on: Mar 03, 2026 | 2:56 PM
Share

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील बोरीवली येथील परिसरात कोट्यवधी रुपयांच्या चोरीमुळे खळबळ माजली आहे. एका ज्वेलरी शॉपवर निशाणा साधत चोरट्यांनी तब्बल 5 किलो सोनं चोरी केलं आहे. चोरीची घटना घडल्यानंतर, पोलीस चौकशीत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. कोणी जवळच्याच व्यक्तीने चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेऊन निरीक्षण गृहात पाठवण्यात आलं आहे, तर पोलिस आता फरार आरोपीचा शोध घेत आहेत. आहे.

कोट्यवधींच्या चोरीमुळे खळबळ…

मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनीतील “माय गोल्ड पॉइंट” नावाच्या दागिन्यांच्या दुकानात ही मोठी चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. हा परिसर मुंबईतील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांपैकी एक मानला जातो. संबंधित घटना 13 आणि 14 जानेवारी 2026 दरम्यान रात्री घडली आहे. जेव्हा सकाळी दुकान चालू करण्यात आलं, तेव्हा शोकेस रिकामे दिसले आणि लाखो नाही तर, कोट्यवधी रुपयांचं सोनं गायब झालेलं होतं. चोरी केलेल्या दागिन्यांची किंमत बाजारात 7 कोटी 88 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलीस तपासात समोर आलं आहे की, अरोपींना दुकानाचा टाळा तोडला नाही तर, डुप्लीकेट चावीचा वापर करून चोरी केली आहे. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीने चोरी केल्याचा संशय वर्तवण्यात आला… चोरी इतकी सुनियोजित होते की, आजूबाजूच्या कोणाला देखील लक्षात आलं नाही. यामुळे सुरुवातीला पोलिसांना शंका आली की हे प्रकरण जवळच्या लोकांशी जोडलेले असू शकते.

कर्मचाऱ्यांवर संशय

चोरीची घटना घडल्यानंतर दुकानातील दोन कर्मचारी अचानक गायब झाले. ज्यामुळे संशय अधिक पक्का झाला. पोलिसांना दुकानाच्या आजू-बाजूला असलेले सीसीटीव्ही देखील तपासले आहेत. अखरे तपासात कळलं की, दुकान बंद करण्याची आणि चावी सांभाळण्याची जबाबदारी त्या दोन कर्मचाऱ्यांवर होती… याच विश्वासाचा फायदा उचलत दोघांनी डुप्लीकेट चावी बनवली… त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला.

दोन आरोपी अटक

या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी गणपत चदाणा (26) आणि किशनलाल उर्फ ​​भैरू बगलाल रेबारी (21) यांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, दोघांनीही महत्त्वाचे खुलासे केले. त्यांच्या माहितीच्या आधारे, आतापर्यंत 3 किलो 100 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहेL. तपासात एका अल्पवयीन मुलाची भूमिका देखील उघड झाली आहे, ज्याला ताब्यात घेऊन निरीक्षण गृहात पाठवण्यात आलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...