सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला आता मनमाड स्थानकावर थांबा

सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला आता मनमाड स्थानकावर थांबा मिळणार आहे. आज मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या ट्रेनचे स्वागत करण्यात आले आहे.

सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला आता मनमाड स्थानकावर थांबा
CSMT-Sainagar Shirdi Vande Bharat Express
| Updated on: Nov 27, 2026 | 6:44 PM

सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला आता मनमाड स्थानकावर थांबा मिळणार आहे. या रेल्वे मंत्रालयाच्या मंजूरी नंतर या गाडी क्रमांक 22223/22224 सीएसएमटी-साईंनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावर मनमाड स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज या ट्रेनचे मनमाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्वागत करण्यात आले.

दि. 27 नोव्हेंबर 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सहून रवाना झालेली गाडी क्र. 22223 सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला मनमाड स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले आहे. यावेळी मनमाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर हजर होते.

Loading...

मनमाड स्थानकातील थांबे पुढील प्रमाणे असणार आहे

ट्रेन क्रमांक 2223 सीएसएमटी–साईंनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीहून सकाळी 6.20 वाजता प्रस्थान करते ती मनमाडला सकाळी 9.53 वाजता पोहचेल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर सकाळी 9.55 वाजता प्रस्थान करेल.

ट्रेन क्रमांक 22224 साईनगर शिर्डी–सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस, जी साईनगर शिर्डीहून सायंकाळी 5.45 वाजता प्रस्थान करते. ती मनमाड स्थानकाववर सायं. 8.50 वाजता पोहचेल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर सायंकाळी 6.52 वाजता प्रस्थान करेल.

या ट्रेनच्या इतर थांब्याची विस्तृत माहितीकरता या वेबसाईटवर जावे अथवा NTES ऐप वा Rail On ऐप डाऊनलोड करावे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us