AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dattatray Bharne : काजू-बदामनंतर दुष्काळ बैठकीत अधिकाऱ्यांच्या डुलक्या, कृषिमंत्री भरणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

काजू-बदामनंतर दुष्काळ बैठकीत अधिकाऱ्यांच्या डुलक्या काढल्याचे समोर आलं आहे. यावर कृषिमंत्री भरणे यांनी पहिली प्रतिक्रिया देत सल्ला दिला आहे.

Dattatray Bharne : काजू-बदामनंतर दुष्काळ बैठकीत अधिकाऱ्यांच्या डुलक्या, कृषिमंत्री भरणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
dattatray bharne newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 21, 2026 | 11:27 AM
Share

अकोल्यातील दुष्काळ आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी डुलक्या काढल्याचे समोर आलं. तर काही अधिकारी मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे समोर आले आहे. तर काही अधिकारी व्हॉट्सअॅप पाहत होते. तर काही फेसबुक लाईव्ह, इन्स्टाग्राम लाईव्ह पाहत होते. यावरून दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य नसल्याची टीका प्रशासनावर होत आहे. यावर आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे, असा सल्ला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. एका बैठकीत काही अधिकारी डुलक्या काढत असल्याचे समोर आलं आहे. यावर भरणे म्हणाले, बैठकीला साडे तीनशे अधिकारी होते. प्रत्येक अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. कलेटक्टर, जीडीए, कृषी आयुक्त, सचिव, विभागीय आयुक्त, महसूल यंत्रणा, एमएसईबीचे अधिकारी होते. सर्व जण होते. इतक्या अधिकाऱ्यांमध्ये एखाद दुसरा असेल. खरंतर आता शेतकरी खूप अडचणीत आहे. .तुम्ही सर्वांनी शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे. कोण काय करतो , म्हणण्यापेक्षा रिझल्टवर लक्ष दिलं पाहिजे. पाठिमागे कोण करतंय… परंतु अधिकाऱ्यांनी गांभीर्य घेतलं पाहिजे’.

‘मी उद्या ठाणे विभागाचा आढावा घेत आहे. परवा मी पुणे विभागाचा आढावा घेणार आहे. मी गुरुवारी नागपूर, तर शनिवारी नाशिक विभागाचा आढावा घेणार आहे. पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांचं नुकसान झालं आहे. शेवटी शेतकऱ्यांचा आक्रोश असे साहजिक आहे. आम्ही शेतकरी आहोत. ज्याचं कळतं, त्याला कळतं. शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. दौरा करून ही परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे राज्य सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांसोबत आहे. राज्यशासनाची मदत, पीक विम्याची मदत असेल, जी शक्य आहे, ती मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटी हे संकट आहे. हे संकट मानवनिर्मित नाही. तर निसर्गाचं संकट आहे. या संकटाला सामोरे जावं लागेल. यात आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहे.

शेतकऱ्यांवर अतिरिक्त व्याज आकारल्याचा संशय आहे, यावर मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कारवाई केली पाहिजे. तुम्ही सहकार मंत्र्‍यांना विचारलं असेल. शेतकऱ्यांशी भावनेशी खेळणाऱ्या, कर्ज कमी असताना ज्यादा दाखवून सरकारची फसवणूक करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्री, सहकार विभागाच्या माध्यमातून कडक कारवाई होईल. अशी कोणत्या बँकेची हिंमत झाली नाही पाहिजे. याची चौकशी होईल’.

Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष