देशात अराजकता पसरवण्याचं काम करु नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Dcm eknath shinde on rahul gandhi : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते देशाला बदनाम करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

देशात अराजकता पसरवण्याचं काम करु नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Eknath shinde criticizes Rahul Gandhi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 5:30 PM

सत्ता मिळत नाही, तर सत्तेवर बसलेल्यांना बदनाम करा, असं धोरण विरोधीपक्षाकडून राबवलं जात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत. त्यांनी देशाची बदनामी चालवली आहे. देशासह विदेशातही ते देशाची बदनामी करत आहेत. त्यांनी अराजकता पसरवण्याचं काम करु नये, असं म्हणत शिंदेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

आनंद दुबे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते. आनंद दुबे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांना शुभेछा देतो अभिनंदन करतो. गेले अनेक वर्ष त्यांना शिवसेनेत काम करताना पाहत आहे. राष्ट्रीय स्तरावर आपल्याशी संपर्कात असणारा अशा प्रकारचा कार्यकर्ता आहेत. नवरात्रीच्या मंगलमय पर्वामध्ये त्यांचा प्रवेश होत आहे. त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. महाराष्ट्रात आपण अनेक कल्याणकारी योजना राबवल्यात. पंतप्रधान मोदी यांचे आम्हाला सहकार्य लाभलं आहे. महाराष्ट्राला विकासाकडे , राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक येत आहे महाराष्ट्र प्रतिके क्षेत्रात नंबर एक आहे, असं शिंदेंनी म्हटलं आहे.

Loading...

राहुल गांधींवर टीका

ज्या पद्धतीने लोक बोलत आहेत, सुप्रीम कोर्टावर चाल करून जात आहेत, देशात अराजकता निर्माण करायची आहे. परकीय व्यक्तींचा हात यामध्ये दिसत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते असून न्यायव्यवस्थेवर प्रहार करण्याचे काम करत आहेत. संविधानाचे पुस्तक हातात घेतात पण संविधान विरोधी काम करत आहेत. देशाची बदनामीही करत आहेत. संविधानिक संस्थाना बदनाम करण्याचे काम करत आहेत. पण लोक फेक नरेटिव्हला फसणार नाही. पाकिस्तानमध्ये हेडलाइन होत असतात. तुम्ही पाकिस्तानची बोली बोलत आहात. राहुल गांधी यांनी देश तोडण्याची भाषा करू नये, देश जोडण्याची भाषा करू नये. कोर्टाने देखील त्यांना फटकारले आहे. हा नेपाळ , बांगलादेश , श्रीलंका नाही हा नवीन भारत, विकसित भारत आहे. जनतेने त्यांना तीन वेळा रिजेक्ट केले आहे. पाणी बिन मछली तडफती है, वैसेही सत्ता के बिन ये तडफ रहे है, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

देशात विरोधीपक्षाकडून आक्रमक आंदोलनांची तयारी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडी आणि लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी देशाच्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कथित एसआयाआर घोटाळ्यावरुन सीजेपी आणि इतरही संघटनांनी सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात निदर्शन सुरु ठेवली आहेत. या सगळ्या प्रकरणी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us