AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

२७ डिसेंबर ‘कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबर हा दिवस कृषी विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी राज्यातील अॅग्रीकॉस विद्यार्थ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती.

२७ डिसेंबर ‘कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा
Panjabrao deshmukh - Agriculture Students Day
| Updated on: Oct 22, 2026 | 4:43 PM
Share

देशाचे पहिले केंद्रीय कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी शिक्षण, संशोधन आणि शेतकरी हितासाठीचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबर हा दिवस ‘कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा केली आहे. २७ डिसेंबर हा दिवस ‘राज्य अॅग्रीकॉस – कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय कृषी क्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक आणि युवकांना प्रेरणा देणारा ठरेल. या माध्यमातून कृषी शिक्षण आणि संशोधनातील योगदानाचा गौरव होईल,” असा विश्वास कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबर हा दिवस कृषी विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी राज्यातील अॅग्रीकॉस विद्यार्थ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अखेर या मागणीला यश आले असून, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने २७ डिसेंबर हा दिवस ‘राज्य अॅग्रीकॉस – कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय २२ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. हा निर्णय राज्यातील कृषी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब ठरणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख हे स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री होते. कृषी शिक्षण, संशोधन आणि शेतकरी संघटनांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. देशात कृषी विद्यापीठांची संकल्पना पुढे आणणे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुनर्गठनासाठी योगदान देणे तसेच १९५५ मध्ये ‘भारत कृषक समाज’ या संस्थेची स्थापना करणे, यांसारख्या कार्यांत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

त्यांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी, कृषी पदवीधर, संशोधक आणि युवकांना प्रेरणा मिळावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, संशोधनाचा आणि नव्या संकल्पनांचा शेतीच्या विकासासाठी उपयोग व्हावा, यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आजच्या बदलत्या परिस्थितीत शेतीसमोर हवामान बदल, पाणीटंचाई आणि बाजारपेठेतील आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ‘राज्य अॅग्रीकॉस – कृषी विद्यार्थी दिन’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होण्यासोबतच कृषी क्षेत्रातील योगदानासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ