AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

I am Very Sorry… सांगलीतील दहावीच्या मुलाने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरुन मारली उडी, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक उल्लेख

सांगलीच्या शौर्य प्रदीप पाटील या दहावीतील विद्यार्थ्याने दिल्ली मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली. सेंट कोलंबस शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे.

I am Very Sorry... सांगलीतील दहावीच्या मुलाने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरुन मारली उडी, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक उल्लेख
Shaurya Patil death
| Updated on: Nov 20, 2025 | 1:29 PM
Share

सांगली जिल्ह्यातील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शौर्य प्रदीप पाटील (१६) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकत होतो. सेंट कोलंबस शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याची सुसाईट नोटही समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य प्रदीप पाटील याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसायाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून नवी दिल्लीतील राजीव नगर भागात स्थायिक आहेत. शौर्य हा दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी होते. मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी शौर्यने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली रस्त्यावर उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेनंतर दिल्लीतील राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सुसाईट नोटमध्ये काय?

पोलिसांना शौर्य पाटीलच्या स्कूल बॅगमध्ये एक दीड पानाची सुसाइड नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्याने शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून हे कृत्य करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. “मेरा नाम शौर्य पाटील हैं… आय अॅम व्हेरी सॉरी. आय डीड धीस. पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय अॅम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया. सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं. स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू.” असे त्याने सुसाईट नोटमध्ये नमूद केले आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

या सुसाइड नोटच्या आधारावर राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल यांच्यासह मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या चार शिक्षिकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शौर्यचे वडील प्रदीप पाटील कामानिमित्त ढवळेश्वर येथे आलेले असताना त्यांना ही दुर्दैवी बातमी मिळाली. त्यानंतर ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. आज २० नोव्हेंबर २०२५ रोजी शौर्य पाटील याच्यावर त्याच्या मूळगावी ढवळेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर आणि पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...