मोठी बातमी! एकनाथ शिंदे नाराज, राज्यातील घडामोडींना वेग, 4 मंत्र्यांना थेट..

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच आता एकनाथ शिंदे यांना मंत्र्यांना मोठा इशारा दिला. चार मंत्र्यांच्या कामावर एकनाथ शिंदे नाराज आहेत. फक्त नाराजच नाही तर त्यांनी या मंत्र्यांना मोठा इशाराही दिलाय.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे नाराज, राज्यातील घडामोडींना वेग, 4 मंत्र्यांना थेट..
Eknath Shinde
| Updated on: Aug 05, 2026 | 7:38 AM

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी ही बंडखोरी केली. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत एक पत्र दिले. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांना मोठा दणका होता. यादरम्यानच शिवसेनेकडून यांना बैठकीसाठी व्हिप जारी करण्यात आले. मात्र, खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. या बंडखोरी करणाऱ्या 6 खासदारांपैकी दोघांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचीही भेट घेतली. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. त्यात शिंदे गटातील खासदारांना थेट मंत्रिपदे मिळणार आहे. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

त्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्री कॅबिनेट बैठक आपल्या मंत्र्यांची घेतली. यादरम्यान त्यांनी जोरदार शाळा  मंत्र्यांची घेतल्याचे कळतंय. एकनाथ शिंदे चार मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. जनतेची कामे करा… आपल्या मतदार संघात पक्ष वाढीवर लक्ष द्या, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना थेट मोठा इशाराच दिला आहे.

जनतेची कामे करा, मतदार संघावर लक्ष द्या नाही तर खांदेपालट अटल असल्याचे त्यांनी मंत्र्यांना स्पष्ट सांगितले. हेच नाही तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी झापल्याचीही माहिती मिळतंय. काही मंत्र्यांच्या कामगिरीवर एकनाथ शिंदे अजिबात समाधानी नाहीत. त्यांनी आता स्पष्ट संकेत त्या मंत्र्यांना खांदे पालटचे दिले आहेत.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी शिवसेना पक्ष वाढीवर आणि जनतेची कामे मंत्री करत नसल्याची खंत एकनाथ शिंदे यांना व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर या मंत्र्यांनी आपली कामगिरी सुधारली नाही तर खांदे पालट निश्चित असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतल्याने भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात वाजले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us