AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक

मीरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटाने भीषण आग लागून 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. शॉर्ट सर्किटमुळे रात्री लागलेल्या या आगीत 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाने आग विझवल्यावर, घटनास्थळी 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा धक्कादायक साठा सापडला, ज्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
मिरा भाईंजर आगीत तिघांनी गमावला जीव
| Updated on: Apr 11, 2026 | 7:20 AM
Share

मुंबईतील मिरा-भाईंदर येथे अतिशय दुर्दैवी आणि हादरवणारी घटना घडली आहे. मिरा-भाईंदर येथे सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या तसेच बरेच लोक जखमीही झाले. त्यापैकी 3 जणांना या अग्नितांडवामुळे जीव गमवावा लागला. इंद्रलोक फेज 4 मधील आरक्षित भूखंडावरील झोपडपट्टीत काल रात्री 8 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीमुळे एकापाठोपाठ एक 3 असे सिलेंडरचे भीषण स्फोट झाले, ज्यामुळे काही क्षणात वस्ती भस्मसात झाली.

आग पसरल्याने सर्व जजण सैरावैरा पळू लागले, झोपड्या, घरातलं सामान क्षणात जळून भस्मसात झालं आणि उरली ती फक्त राख. अनेक झोपड्या जळाल्या, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र तोपर्यंत बरच नुकसानझालं होतं. अखेरी अथक प्रयत्नांनी, आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं.

3 जणांचा मृत्यू

रात्री लागलेल्या या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला. आगीमुळे ते प्रचंड होरपळले होते, जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. या आगीत उत्तर प्रदेशचे गुड्डू राम (वय 46) आणि पश्चिम बंगालचे सुरज लियाकत अली मंडळ (वय 14),रोहित रहेमत अली मंडळ (वय15) असे दोन अल्पवयीन मुलांचा मिळून एकूण 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

सापडले 24 सिलेंडर

दरम्यान ही आग विझवल्यानंतर समोर जे दृश्य दिसलं त्याने सगळेच चक्रावले. कारण ज्या झोपडपट्टीमध्ये आग लागली होती, त्या परिसरात तपासादरम्यान 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा सापडल्याने खळबळ उडाली. एकीकडे देशात गॅसचा तुटवडा असताना झोपडपट्टीत इतका मोठा साठा कुणी आणि का केला? याचा तपास सुरू आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 24 सिलेंडर जप्त केले असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक