AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत कोणत्या जागांसाठी वाद, विधानपरिषद निवडणुकीसाठी पडद्यामागे नेमकं काय चालू? फडणवीसांनी थेट सांगितलं!

हायुतीमध्ये एकूण 17 जागांसाठीचा संभाव्य फॉर्म्यूला समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या निवडणुकीत भाजपाकडे 12 जागा असण्याची शक्यता आहे. शिंदे गट एकूण चार जागा लढवू शकतो.

महायुतीत कोणत्या जागांसाठी वाद, विधानपरिषद निवडणुकीसाठी पडद्यामागे नेमकं काय चालू? फडणवीसांनी थेट सांगितलं!
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 25, 2026 | 4:46 PM
Share

Mahayuti Seat Distribution : विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंत राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये जागावाटपादरम्यान रस्सीखेच सुरू आहे. आपल्याच पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळायला हव्यात, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. एकीकडे जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असताना दुसरीके महायुतीतील तिन्ही घटकपक्षांमधील जागावाटपाचे सूत्र समोर आले आहे. तर काही जागांसाठी अजूनही महायुतीमध्ये एकमत झालेले नाही. असे असले तरी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असून महायुतीतील बडे नेते एकमेकांशी चर्चा करत आहेत. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नेमकं कोणत्या जागांवरून तिढा अद्याप कायम आहे, याची अप्रत्यक्षपणे माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीने कोणकोणत्या जागांवर दावा केला

आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी हिंगोली, परभणीची जागा शिवसेना लढवण्याची शक्यता आहे. तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीकडून पुण्याच्या जागेवरही दावा केला जात आहे. राष्ट्रवादीनेच कोकण, हिंगोली-परभणीच्या जागेवरही दावा केल्याची माहिती मिळत आहे.

आम्ही एकत्र बसू, चर्चा करू

याच जागावाटपाच्या तिढ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेशी आमची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीसोबत पुण्याच्या जागेबाबत आमची चर्चा सुरू आहे. आम्ही एकत्र बसू. त्यावर मार्ग काढू. अद्याप मार्ग निघालेला नाही, आमची चर्चा सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले.

महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला काय?

दरम्यान, महायुतीमध्ये एकूण 17 जागांसाठीचा संभाव्य फॉर्म्यूला समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या निवडणुकीत भाजपाकडे 12 जागा असण्याची शक्यता आहे. शिंदे गट एकूण चार जागा लढवू शकतो. तर राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. कोणाला किती जागा मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. त्याआधी आगामी दिवसांत काय काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ