मोठी बातमी! या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये थेट बंद, ही चूक केल्याने यादीतून नाव गायब; तुमचे नाव तर नाही ना?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेविषयी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी ई-केवायसीसंदर्भातही महत्त्वाचे संकेत दिले आहेत. निकष पूर्ण न करणाऱ्यांना लाभ मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

मोठी बातमी! या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये थेट बंद, ही चूक केल्याने यादीतून नाव गायब; तुमचे नाव तर नाही ना?
ladki bahin yojana e kyc
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2026 | 4:13 PM

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी करण्याची मुदत आता संपली आहे. नव्याने ई-केवायसी करण्याचा कोणताही पर्याय आता उपलब्ध नाही. दरम्यान, साधारण 80 लाख लाडक्या बहिणींचे नाव लाभार्थी यादीतून हटवण्यात आले आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींचे नाव का हटवण्यात आले, त्यांना भविष्यात ई-केवायसी करण्याची संधी मिळणार का? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही पुन्हा एकदा ई-केवायसीची विंडो सुरू करू, असे संकेतही फडणवीस यांनी दिले आहेत.

…. परंतु मोठ्या प्रमाणात ई-केवायसी झाली नाही

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आपण केवायसी करा असे सांगितले होते. आपण जी काही माहिती सादर केलेली आहे, ती आतापर्यंत सत्य माणण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्रं सादर करा, असे सांगितले होते. परंतु मोठ्या प्रमाणात ई-केवायसी झाली नाही, अशी माहिती फडणीस यांनी दिली.

ज्यांनी निकष पूर्ण केलेले आहेत त्यांना…

तसेच, ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही, असे समजणे काही योग्य नाही. जवळपास नऊ महिने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. परंतु तरीदेखील ज्यांनी केवायसी केलेली नाही, ते अर्थातच कुठलातरी एखादा निकष पूर्ण करत नाहीत म्हणूनच त्यांनी केवायसी केलेली नाही. म्हणूनच 80 लाख लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करताना दिसत नाहीत. 1 कोटी 70 लाख महिला या योजनेचे निकष पूर्ण करतात. ज्यांनी निकष पूर्ण केलेले आहेत. त्यांना भविष्यातही पैसे मिळतच राहतील. परंतु ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही, त्यांना आता पैसे मिळणार नाहीत, अशी थेट माहिती फडणवीस यांनी दिली.

भविष्यात पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेअंतर्गत…

दरम्यान, ज्या लाडक्या बहिणींनी योजनेचे निकष पूर्ण केलेले नाहीत आणि ई केवायसी केलेली नाही त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. परंतु भविष्यात पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीचा पर्याय खुला होऊ शकतो. सरकार तसा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Follow Us