AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांच्या निधनानंतर DGCA चा सर्वात कठोर निर्णय, विमान कंपन्यांसाठी नवीन नियम काय?

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर DGCA ने खासगी विमान कंपन्यांसाठी 'झिरो टॉलरन्स' धोरण जाहीर केले आहे. VSR व्हेंचर्सची विमाने ग्राऊंड करण्यात आली असून, आता कंपन्यांच्या व्यवस्थापनावरही थेट कारवाई केली जाणार आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर DGCA चा सर्वात कठोर निर्णय, विमान कंपन्यांसाठी नवीन नियम काय?
ajit pawar plane crash
| Updated on: Feb 25, 2026 | 8:15 AM
Share

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीतील एका विमान अपघातात निधन झाले. या दुर्देवी घटनेनंतर संपूर्ण देशभरात विमान सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सर्व नॉन-शेड्यूल ऑपरेटर्स (NSOP) आणि खासगी विमान कंपन्यांसाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण जाहीर करत ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता नुकतंच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सर्व खासगी आणि चार्टर विमान कंपन्यांसाठी (NSOP) नवीन आणि अत्यंत कठोर नियमावली जाहीर केली.

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर आता DGCA ने एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. यावेळी DGCA कडून खासगी विमान कंपन्यांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आता इथून पुढे व्हीआयपी संस्कृती किंवा व्यावसायिक नफा यापेक्षा प्रवाशांची सुरक्षा सर्वोच्च असेल, अशा शब्दात DGCA ने फटकारले आहे.

खासगी विमान कंपन्यांसाठी नवे नियम काय?

  • कोणत्याही तांत्रिक त्रुटीकडे दुर्लक्ष झाल्यास कंपनीचा परवाना रद्द केला जाईल.
  • विशेष म्हणजे, आता केवळ वैमानिकाला दोष न देता, कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनालाही (Management) कायदेशीररित्या जबाबदार धरले जाईल.
  • ज्याप्रमाणे हॉटेल्सना स्टार रेटिंग असते, तसेच आता चार्टर कंपन्यांना त्यांच्या सुरक्षा नोंदीनुसार सेफ्टी रँकिंग दिले जाईल. हे रँकिंग सार्वजनिक केले जाईल, जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित पर्याय निवडता येईल.
  • खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाड असल्यास उड्डाण रद्द करण्याचा पूर्ण अधिकार वैमानिकाला (Pilot) देण्यात आला आहे.
  • कोणताही राजकीय दबाव किंवा कंपनीच्या दबावाखाली उड्डाण केल्यास कडक कारवाई होईल.
  • प्रत्येक कंपनीला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर विमानाचे वय, त्याचा देखभालीचा इतिहास (Maintenance History) आणि पायलटचा एकूण अनुभव जाहीर करणे आता बंधनकारक आहे.
  • अनेकदा ‘कमी दृश्यमानता’ (Low Visibility) हे विमान अपघातांचे मुख्य कारण ठरत असल्याने, सर्व विमानांमध्ये ADS-B आणि रिअल-टाईम हवामान अपडेट देणारी यंत्रणा बसवणे अनिवार्य असेल.
  • तसेच विमानातील कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR), इंधन नोंदी आणि इतर तांत्रिक डेटाची DGCA कडून नियमितपणे कठोर तपासणी केली जाईल.
  • अजित पवार यांच्या प्रकरणात ऐनवेळी वैमानिक बदलल्याच्या चर्चा होत्या, त्या पार्श्वभूमीवर आता ‘पायलट रोस्टर’मध्ये शेवटच्या क्षणी बदल करण्यावरही निर्बंध येण्याची शक्यता आहे.

विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार

दरम्यान अजित पवार यांचा ज्या Learjet 45 (VT-SSK) विमानात अपघाती मृत्यू झाला, त्या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विमानाची देखभाल आणि सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत DGCA ने संबंधित VSR व्हेंचर्स कंपनीची इतर चार विमाने तातडीने जमिनीवर उतरवण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत या विमानांची पूर्ण तांत्रिक तपासणी होत नाही, तोपर्यंत त्यांना उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासगी विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार असून, चार्टर विमानांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...