AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यामुळेच आपले वाटुळे झाले रे… भर मंचावर धनंजय मुंडे बोलून गेले, थेट दसरा मेळाव्याच्या..

धनंंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला पोहोचले. यावेळी धनंजय मुंडे नक्की काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. धनंजय मुंडे यांनी आपल्या अंदाजामुळे मनातील खदखद बोलून दाखवली. फार सहन केले, असे मोठे विधान त्यांनी केले.

यामुळेच आपले वाटुळे झाले रे... भर मंचावर धनंजय मुंडे बोलून गेले, थेट दसरा मेळाव्याच्या..
Dhananjay Munde
| Updated on: Oct 20, 2026 | 2:46 PM
Share

Pankaja Munde Dasra Melava Today : मराठवाड्यात मोठा दुष्काळ आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. त्यातच आता पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याकडे सर्वांच्या नजरा होत्या. धनंजय मुंडे गेल्या वर्षीपासून पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत. धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांचे मंत्रिपदही गेले. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी धनंजय मुंडे भाषणासाठी उभे राहताच उपस्थितांनी घोषणाबाजी सुरू केली… यावर धनंजय मुंडे यांनी म्हटले की, यामुळेच आपले वाटूळे झाले रे… यावेळी धनंजय मुंडे दुष्काळाबद्दल बोलताना दिसले. आज दुष्काळाचे मोठे संकट उभे असल्याचे त्यांनी म्हटले. महायुती सरकार शेतकऱ्यांना सर्व मदत पोहोचवणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणताना दिसले. कधीही कुठल्याही घटकाला कुठलीही अडचण आली मी आणि ताई त्यांच्या मागे उभे राहिलो.

ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांना संधी मिळाली, त्यावेळी त्यांनी या जिल्ह्यात विकासाची गंगा आणली. ज्यावेळी पंकजा मुंडे यांना संधी मिळाली, त्यावेळी त्यांनी विकास आणला. मी ऊसतोड कामगारांसाठी निर्णय पण हे करूनही आम्ही टीकेचे धनी होतो. काही वेळा ताई असतात तर काही वेळा मी असतो. मागच्या दसरा मेळाव्यात बोललो आणि आता बोललो. बाकी कुठेही व्यक्त झालो नाही.

तुम्ही कितीही बोला पण मी बोलणार नाही, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले. पुढे धनंजय मुंडे यांनी म्हटले की, हवा मचल रही हैं. इन दिनो हवा तेज चल रही हैं. कुछ मैहफिले ऐसे बैठी हैं मेरी तबाही के लिये. उन्हे मालूमही नही हवा रुख बदल रही हैं… आता धनंजय मुंडे यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे.

धनंंजय मुंडे यांनी म्हटले, आज महायुतीचा आमदार म्हणून, मी पंकजा मुंडे आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. तुम्ही देखील ऊसतोड, शेतकऱ्यांच्या मागे खंबीर पानाने उभे रहा. कोणाला कसली अडचण आली तर त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आम्हाला संधी मिळाली तेव्हा विकास केला. फार सहन केले, असेही त्यांनी म्हटले.

Follow Us
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!