धनंजय मुंडे ते सुरेश धस, जरांगे पाटलांनी कोणा कोणाकडून पैसे घेतले? अमोल खुणेंनी यादीच सांगितली, गंभीर आरोप

मराठा समाजाला सगेसोयरे अधिसूचनेनुसार कायदा लागू करून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अमोल खुणे यांचं उपोष सुरू आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

धनंजय मुंडे ते सुरेश धस, जरांगे पाटलांनी कोणा कोणाकडून पैसे घेतले? अमोल खुणेंनी यादीच सांगितली, गंभीर आरोप
manoj jarange patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 31, 2026 | 8:55 PM

मराठा समाजाला सगेसोयरे अधिसूचनेनुसार कायदा लागू करून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अमोल खुणे यांचं भर उन्हात रुई धानोरा परिसरातील शेतामध्ये आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी नॉर्को टेस्टची मागणी केली होती, यावर प्रतिक्रिया देताना अमोल खुणे यांनी मोठं विधान केलं आहे.  मनोज जरांगे पाटलांनी नार्को टेस्टची केलेली मागणी चांगली आहे. यात सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येणार आहे.  2016 मध्ये अमोल खुणे आणि मनोज जरांगे पाटील हे धनंजय मुंडेंकडे नेमकं कशासाठी गेले होते, आणि धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना 20 लाख रुपये काशासाठी दिले होते?  हे नार्को टेस्टमध्ये सर्वांना कळेल असं अमोल खुणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मनोज जरांगे यांची शिवबा संघटना जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे कशासाठी गेली होती? आणि क्षीरसागर यांनी किती पैसे दिले होते? सुरेश धस यांच्याकडे देखील गेले होते, त्यांनी किती पैसे दिले? हे सर्व आपोआप समोर येईल, आज मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे आमचं आयुष्य बरबाद झालं आहे, असा आरोप यावेळी अमोल खुणे यांनी केला आहे.

धनंजय देशमुख यांच्यावर प्रतिक्रिया

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर पिस्तुल दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यावर देखील यावेळी अमोल खुणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुखांवर अन्याय झाला त्यांना समाजाने न्याय देण्याचा प्रयत्न केला. समाजाने पाच दहा कोटीचा बंगला दिला. गडगंज प्रॉपर्टी आमदार, खासदारांकडून मिळाली.  मात्र कुठेतरी धनंजय देशमुख हे समाधानी नाहीत. धनंजय देशमुख व त्यांचा साडू दादा खिंडकर हे गुन्हेगारच आहेत. समाधान खिंडकरला धनंजय देशमुख बंदूक दाखवून धमकावतात, त्यांच्यामध्ये एवढी हिंमत कुठून आली.  आज समाधान खिंडकरला बंदूक दाखवली, उद्या अमोल खुणेलाही बंदूक दाखवेल, असंही यावेळी खुणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us