AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 कोटींची डील आणि सॉरीचा मेसेज; करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट! जरांगे हत्या कट प्रकरणातील मोठी माहिती

माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद वाढला आहे. जरांगे यांनी मुंडेंवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला, तर करुणा मुंडेंनीही धनंजय मुंडेंवर तोच आरोप करत दादा गरडचा संदर्भ दिला.

1 कोटींची डील आणि सॉरीचा मेसेज; करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट! जरांगे हत्या कट प्रकरणातील मोठी माहिती
Dhananjay Munde Manoj Jarange Patil Karuna Munde
| Updated on: Nov 07, 2025 | 5:17 PM
Share

माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. धनंजय मुंडे आपल्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला. त्यावर धनजंय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत अत्यंत आक्रमक भूमिका घेत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आता याप्रकरणी स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वादात उडी घेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनीच मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दादा गरड माझ्याकडे तीन वेळा येऊन गेला

मनोज जरांगे पाटील यांच्यावरील हल्ल्याचा कट धनंजय मुंडे यांनीच केला असणार. धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या बायकोला सोडले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ते मला त्रास देत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची आतील टीम फोडण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केली आहे. पोलिसांच्या कैदेत असलेला आरोपी दादा गरड माझ्याकडे तीन वेळा येऊन गेला आहे. जेव्हा मी जरांगेकडे गेली होती. त्याने मला मेसेज केला तेव्हा मी जरांगेकडे होते. त्यानंतर लगेच धनंजय मुंडेंना माहिती मिळाली की मी मनोज जरांगेंकडे गेली आहे, असे करुणा मुंडे म्हणाल्या.

१ कोटीची डील सुरु होती

दादा गरड यांचे मोबाईल तपासा. व्हॉट्सअॅप चॅट्स आहेत. मेसेज आहेत. धनंजय मुंडे यांनी त्याला सॉरी म्हणून मेसेज केला होता. ते खूप गरीब व्यक्ती आहेत. धनंजय मुंडेंनी त्याला पाच लाख रुपये त्याला पाठवले होते. एका गरीब माणसाला धनंजय मुंडे सॉरी का बोलतोय. पाच लाख कशासाठी दिले. हे सर्व पुरावे त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत. मला दुसऱ्या आरोपीचीही रेकॉर्डिंग त्याने ऐकवली होती. त्यांची १ कोटीची डील सुरु होती, असा गंभीर दावा करुणा मुंडेंनी केला आहे.

हे सत्य बाहेर आणण्यासाठी त्यांनी धनंजय मुंडे, मनोज जरांगे पाटील आणि माझी देखील नार्कोटेस्ट करा अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे सारखी नासकी वृत्ती आम्हाला संपवायची आहे. धनंजय मुंडेंना मराठवाड्यातून नव्हे, तर देशातून बाहेर काढून अमेरिकेला पाठवावे आणि त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करुणा मुंडेंनी केली आहे. या सगळ्या संघर्षामुळे आत्महत्या करण्याची वेळ आपल्यावर आली असून मी एकटी पडली आहे, असेही करुणा मुंडे म्हणाल्या.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.